Marathi News> मनोरंजन
Advertisement

'एका मूर्ख बाईसाठी तो...', गोविंदाची पत्नी सुनिता अहुजा स्पष्टच बोलली, 'मी हे कधीही स्विकारणार...'

बॉलिवूड अभिनेता गोविंदाची (Govinda) पत्नी सुनिता अहुजाने (Sunita Ahuja) पुन्हा एकदा घटस्फोटाच्या चर्चांवर भाष्य केलं आहे. गोविंदा माझ्याशिवाय जगू शकत नाही असा दावा तिने केला आहे.   

'एका मूर्ख बाईसाठी तो...', गोविंदाची पत्नी सुनिता अहुजा स्पष्टच बोलली, 'मी हे कधीही स्विकारणार...'

गेल्या काही महिन्यापासून बॉलिवूड अभिनेता गोविंदा (Govinda) आणि त्याची पत्नी सुनिता अहुजा (Sunita Ahuja) घटस्फोट घेणार असल्याच्या चर्चा रंगल्या आहेत. दोघेही मागील 38 वर्षांपासून एकत्र असून, आता विभक्त होणार असल्याची बॉलिवूडमध्ये चर्चा आहे. सुनिता अहुजाने मात्र यावर भाष्य करत या सर्व अफवा असल्याचं स्पष्ट केलं आहे. गोविंदा आपल्याशिवाय राहू शकत नाही असा दावा तिने केला आहे. तसंच गोविंदा दुसऱ्या महिलेसाठी आपल्या कुटुंबाला सोडणार नाही असा विश्वासही व्यक्त केला आहे. 

झूमला दिलेल्या मुलाखतीत सुनिता अहुजाने आपल्या घटस्फोटाच्या चर्चा आणि विवाहबाह्य संबंधांवर भाष्य केलं आहे. "ज्या दिवशी शिक्कामोर्तब होईल, अन्यथा माझ्या किंवा गोविंदाच्या तोंडून ऐकाल तर ती वेगळी गोष्ट आहे. पण मला वाटत नाही की गोविंदा माझ्याशिवाय राहू शकेल. आणी मीदेखील त्याच्याशिवाय राहू शकत नाही. गोविंदा कोणत्याही मूर्ख व्यक्ती किंवा महिलेसाठी आपल्या कुटुंबाला सोडणार नाही. ".

सुनिताने पुढे सांगितलं की, "फक्त अफवा, अफवा आणि अफवा आहे. तुम्ही आधी हे खरं आहे का हे तरी विचारा. मी हे कधीही स्विकारणार नाही. कोणाची हिंमत असेल तर त्याने माझ्यासमोर येऊन विचारावं. कोणीतरी अफवा उडवली आणि तुम्ही फक्त त्याच्या होकार देत आहात. हे योग्य नाही. जर असं काही असेल तर मी पहिली व्यक्ती असेल जी मीडियासमोर येईल आणि त्याबद्दल सांगेन. पण माझा विश्वास आहे की, देव कधीही माझं कुटुंब वेगळं होऊ देणार नाही".

गोविंदा आणि सुनिता अहुजा 1986 मध्ये विवाहबद्ध झाले. त्यांना यशवर्धन आणि टीना अशी दोन मुलं आहेत. हर्षवर्धन लवकरच बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार आहे. 

Read More