Marathi News> मनोरंजन
Advertisement

'गदर 2' मधील सनी देओलचा फर्स्ट लूक समोर, पाहा फोटो

बॉलीवूड अभिनेता सनी देओलने चित्रपटांमधून ब्रेक घेत इंडस्ट्रीत परतण्याचा निर्णय घेतला आहे.

'गदर 2' मधील सनी देओलचा फर्स्ट लूक समोर, पाहा फोटो

मुंबई : बॉलीवूड अभिनेता सनी देओलने चित्रपटांमधून ब्रेक घेत इंडस्ट्रीत परतण्याचा निर्णय घेतला आहे. सनी देओलकडे सध्या ३-४ चित्रपट आहेत. त्यापैकी 'गदर २'  प्रेक्षक बऱ्याच दिवसांपासून या चित्रपटाची वाट पाहत होते. दिग्दर्शक अनिल शर्मासोबत सनी देओलने गदर 2 चं शूटिंग सुरू केलं आहे. ज्यामध्ये अमिषा पटेल आणि उत्कर्ष शर्मा महत्त्वपूर्ण भूमिका साकारताना दिसणार आहेत. गदर 2 मध्येही सनी देओल भारतीय चित्रपटसृष्टीतील प्रतिष्ठित पात्रांपैकी एक तारा सिंगची भूमिका साकारताना दिसणार आहे.

सनी देओलने नुकताच इंस्टाग्राम अकाऊंटवर गदर 2 चित्रपटातील त्याचा पहिला लूक चाहत्यांसह शेअर केला आहे. ज्यामध्ये तो पगडी घातलेला दिसत आहे आणि त्याच्या चेहऱ्यावर मोठी दाढी आणि मिशा आहे. चाहत्यांना गदर 2 मधील सनी देओलचा फर्स्ट लूक आवडत आहे . गदर 2 चित्रपटातील सनी पाजीचा लूक पाहून हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर बंपर कमाई करेल असं प्रेक्षक कमेंट करुन सांगित आहेत.

एका चाहत्याने सनी देओलच्या फोटोखाली लिहिलं आहे, 'तारा सिंह परत येत आहे. बाकी सगळे हिरोज तारा सिंगसमोर बौने दिसतील.'' तर दुसऱ्या चाहत्याने लिहिलं आहे की, 'यावेळीही तारा सिंग बॉक्स ऑफिसवर सुनामी आणणार आहेत. गदर 2 चित्रपटगृहांमध्ये 500 कोटी कमावणार आहे.''

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

गदर 2 या चित्रपटाबाबत प्रेक्षक ज्या उत्साहाने पाहत आहेत. त्यावरून सनी देओल गदर 2 द्वारे बॉलिवूडमध्ये यशस्वी पुनरागमन करेल असं दिसतं. सनी देओल एकेकाळी त्याच्या अॅक्शनसाठी प्रसिद्ध होता. तो इंडस्ट्रीतील सर्वात मोठा अॅक्शन स्टार मानला जातो. 

Read More