Marathi News> मनोरंजन
Advertisement

VIDEO: वडिलांचा 88 वा वाढदिवस, केक कापताना सनी देओलच्या डोळ्यात पाणी

Sunny Deol Emotional Video: आज धर्मेंद्र यांनी आपला 88 वा वाढदिवस साजरा केला. त्यांच्या वाढदिवसानिमित्त आज भलामोठा केक आणला होता. यावेळी सनी देओलही आपल्या वडिलांच्या वाढदिवसाच्या दिवशी भावूक झाला होता. 

VIDEO: वडिलांचा 88 वा वाढदिवस, केक कापताना सनी देओलच्या डोळ्यात पाणी

Sunny Deol Emotional Video: आज ज्येष्ठ अभिनेते धर्मेंद्र यांनी आपला 88 वा वाढदिवस साजरा केला आहे. त्यामुळे त्याची विशेष चर्चा रंगलेली आहे. यावेळी त्यांच्या वाढदिवसानिमित्तानं खास केक आणला होता. यावेळी वडिलांच्या 88 वाढदिवसानिमित्त केक कापताना पाहून त्यांना आपले अश्रू अनावर झाले आहेत. सध्या त्याचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर जोरात व्हायरल होताना दिसतो आहे. काही मिनिटाच हा व्हिडीओ सोशल मीडियावर जोरात व्हायरल झाला असून वडील आणि मुलाच्या नात्यातील हा भावूक क्षण पाहून चाहतेही इमोशनल झाले आहेत. यावर्षी सनी देओल आणि बॉबी देओल या दोघांचेही चित्रपट प्रचंड गाजले. सनी देओलचा गदर 2 हा चित्रपट प्रचंड गाजला. त्याचसोबत सध्या बॉबी देओलचा Animal हा चित्रपटही प्रचंड गाजतो आहे. 

धर्मेंद्र यांच्या वाढदिवसानिमित्त सनी देओल आणि बॉबी देओल यांनी खास पोस्ट शेअर केली आहे. सनी देओल यानं लिहिलंय की, ''पापा, वाढदिवसाच्या शुभेच्छा. तुमचा मुलगा असल्याचा मला अभिमान आहे.'' तर बॉबी देओलनं लिहिलं आहे की, ''पापा, वाढदिवसाच्या खूप शुभेच्छा. माझं तुमच्यावर खूप प्रेम आहे.'' सध्या या दोघांच्याही या पोस्टवर चाहत्यांनी तूफान कमेंट्स केल्या आहेत. धर्मेंद्र यांच्या अभिनयाचे आपण सर्वच जणं फॅन्स आहोत. त्यांचा जन्म हा 8 डिसेंबर 1935 रोजी नसराली येथे झाला. त्यांच्या अभिनयाची जादू ही तेव्हाही कायम होती आणि आताही कायम आहे. यावर्षी त्यांचा 'रॉकी और रानी की प्रेम कहानी' हा चित्रपट प्रदर्शित झाला होता. 

या चित्रपटाची जोरात चर्चा होती. रोमॅण्टिक आणि गंभीर भुमिकांसाठी धर्मेंद्र हे ओळखले जातात. त्यांच्या अनेक भुमिका या गाजल्या आहेत. त्यातूनही 'सीता और गीता', 'यादों की बारात', 'शोले', 'फूल और काटें', 'यमला पगला दिवाना' असे अनेक चित्रपटही लक्षात राहिले आहेत. धर्मेद्र यांचीही मुलंही या क्षेत्रात सक्रीय आहेत. ईशा देओलही लोकप्रिय अभिनेत्री आहे. सनी आणि बॉबी देओलही 90 च्या काळातील लोकप्रिय हिरो आहेत. खुद्द हेमा मालिनीही लोकप्रिय अभिनेत्री आणि नृत्यांगना आहेत. 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

धर्मेंद्र यांच्या या वाढदिवसाच्या व्हिडीओवर नेटकरीही जोरात कमेंट्स करताना दिसत आहेत. यावेळी चाहत्यांनीही त्यांना वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा दिल्या आहेत. मध्यंतरी काही दिवसांसाठी ते परदेशात होते. परंतु सध्या ते भारतात असल्याचे समजते आहे. जून महिन्यात त्यांच्या नातवाचे लग्न होते. करण देओलच्या लग्नात त्यांनी मनसोक्त डान्स केला होता ज्याची जोरात चर्चा होती. 

Read More