Marathi News> मनोरंजन
Advertisement

'मी आता यापुढे शाहरुख खानसोबत...', सनी देओलने अखेर जाहीर करुन टाकलं, म्हणाला 'आमीर खानमुळेच...'

बॉलिवूड अभिनेता सनी देओलने (Sunny Deol) शाहरुख खानसह (Shah Rukh Khan) पुन्हा काम करण्यावर आणि आमीर खानची (Aamir Khan) निर्मिती असणाऱ्या लाहोर 1947 (Lahore 1947) चित्रपटात काम करण्यावर भाष्य केलं आहे.   

'मी आता यापुढे शाहरुख खानसोबत...', सनी देओलने अखेर जाहीर करुन टाकलं, म्हणाला 'आमीर खानमुळेच...'

बॉलिवूड अभिनेता सनी देओल (Sunny Deol) सध्या आपला आगामी चित्रपट 'जाट'च्या प्रमोशनमध्ये व्यग्र आहे. या चित्रपटात सनी देओलसह रणदीप हुडा (Randeep Hooda) आणि विनीत कुमार सिंगही (Vineet Kumar Singh) मुख्य भूमिकेत झळकणार आहेत. चित्रपटाच्या प्रमोशनदरम्यान सनी देओलने शाहरुख खानसोबत (Shah Rukh Khan) पुन्हा काम करण्यावर आणि राजकुमार संतोषी यांच्यासह करत असलेल्या लाहोर 1947 चित्रपटावर भाष्य केलं. शाहरुख आणि सनी देओल (Sunny Deol) यांनी यश चोप्रा दिग्दर्शित 'डर' चित्रपटात एकत्र काम केलं होतं. या चित्रपटादरम्यान त्यांच्यात वाद झाला होता. मात्र आता त्यांनी हे शत्रुत्व मागे सोडलं आहे. 
 
Pinkvilla ला दिलेल्या मुलाखतीत देओलने त्याच्या कारकिर्दीबद्दल, प्रेरणांबद्दल आणि त्याच्या आगामी प्रोजेक्ट 'जाट', 'लाहोर 1947' आणि 'रामायण' याबद्दल सांगितलं. बॉलिवूडमधील बदलत्या गोष्टी आणि दोन नायक असणाऱ्या चित्रपटांबद्दल बोलताना त्याने एका अभिनेत्याचा उल्लेख केला ज्याच्यासोबत स्क्रीन शेअर करण्यास त्याला हरकत नाही. देओल म्हणाला, "मी शाहरुखसोबत फक्त एकाच चित्रपटात काम केलं आहे, पण आपण दुसरा चित्रपट करू शकतो. तो एक वेगळा काळ होता आणि आता सगळं बदललं आहे त्यामुळे तो छान होईल परंतु समस्या अशी आहे की दिग्दर्शकांकडे पूर्वीइतके नियंत्रण नाही आणि अशा कलाकारांच्या प्रतिमेला न्याय देऊ शकणाऱ्या कथा लिहिल्या जात नाहीत".

सनी देओल आणि शाहरुख यांनी यश चोप्रा दिग्दर्शित 'डर' (1993) मध्ये एकत्र काम केलं होतं. पण आपल्या भूमिकेला योग्य न्याय न मिळाल्याने सनी देओल नाराज झाला होता. चित्रपटात सनी नायक असतानाही नकारात्मक भूमिका साकारणाऱ्या शाहरुख खानला जास्त महत्त्व देण्यात आलं असा त्याचा विरोध होता. त्यानंतर तब्बल १६ वर्षे दोघांनी एकमेकांशी अबोला धरला होता. 

दिग्दर्शक राजकुमार संतोषी यांच्यासोबत पुन्हा काम करण्याबद्दल बोलताना सनी देओल म्हणाला की, त्यांच्या एकत्र काम करण्याबद्दल सर्वांनाच उत्सुकता आहे. याआधीच्या त्यांच्या तीन चित्रपटांना प्रेक्षकांनी भरभरुन प्रेम दिलं आहे, ज्यात दामिनी (1993), घायल (1990) आणि घातक (1996) यांचा समावेश आहे. "आम्ही अनेक वर्षांपासून लाहोरवर काम करत होतो. अनेक वेगवेगळ्या कलाकारांनी कथा ऐकली आणि त्यांचा चित्रपटासाठी विचार करण्यात आला, पण ते होऊ शकले नाही. पण पुन्हा एकदा 'गदर 2' ने ते साध्य केले आहे. जेव्हा आमिरने माझ्याशी संपर्क साधला आणि म्हटलx, 'सनी, आम्हाला हा चित्रपट बनवायचा आहे,' तेव्हा मला आश्चर्य वाटलं. कारण मी कधीही असा विचार केला नव्हता की एखादा अभिनेता चित्रपटाची निर्मिती करेल".

आगामी चित्रपटांबद्दल बोलताना त्याने लाहोर 1947 ला विलंब होण्यामागील कारणही सांगितलं. "मी जाटच्या आधी 'लाहोर 1947' चं चित्रीकरण सुरू केलं होतं. परंतु त्यात जास्त वेळ लागत आहे, कारण आमिर निर्माता आहे आणि तो त्याचा वेळ काढून सर्वकाही पाहू इच्छितो आणि त्याला सर्वकाही परिपूर्ण हवे आहे," असं सनीने सांगितलं. 

Read More