Marathi News> मनोरंजन
Advertisement

PICS: पुन्हा आई बनली सनी, दोन चिमुकल्यांचे झाले आगमन

बॉलीवूड अभिनेत्री सनी लिओनी पुन्हा आई बनलीये. त्यांची नावे अशेर सिंह वेबर आणि नोहा सिंह वेबर अशी आहे. सनीचे पती डॅनियलने सोमवारी या दोघांचे फोटो शेअर केलेत. 

PICS: पुन्हा आई बनली सनी, दोन चिमुकल्यांचे झाले आगमन

मुंबई : बॉलीवूड अभिनेत्री सनी लिओनी पुन्हा आई बनलीये. त्यांची नावे अशेर सिंह वेबर आणि नोहा सिंह वेबर अशी आहे. सनीचे पती डॅनियलने सोमवारी या दोघांचे फोटो शेअर केलेत. सरोगसीद्वारे या दोन मुलांचा जन्म झालाय. 

याआधीही सनीने मुलीला घेतले होते दत्तक

याआधी सनी लिओनी आणि डॅनियलने मुलीला दत्तक घेतले होते. या मुलीचे नाव निशा वेबर आहे. काही दिवसांपूर्वीच दिलेल्या मुलाखतीत सनीने निशा घरात आल्यानंतर त्यांच्या जीवनात आनंद आलाय. निशाला सकाळी गुड मॉर्निंग कोण म्हणणार यासाठी आमच्यात चढाओढ सुरु असते. 


तो आनंद अवर्णनीय

सनी म्हणाली, मुलीला दत्तक घेतल्यानंतरच आनंद अवर्णनीय असा आहे. 

Read More