Marathi News> मनोरंजन
Advertisement

सनी लिओनने सांगितला फिट ठेवण्याचा सोपा उपाय, जाणून घ्या सनीचा फिटनेस फंडा

सनी लिओनी सोशल मीडियावर सोशल मीडियावर खूप अ‍ॅक्टिव्ह असते

 सनी लिओनने सांगितला फिट ठेवण्याचा सोपा उपाय, जाणून घ्या सनीचा फिटनेस फंडा

मुंबई : सनी लिओनी सोशल मीडियावर जितकी अ‍ॅक्टिव्ह आहे तितकीच तिला आजूबाजूच्या जगात काय चालले आहे याची जाणीवही आहे. पेट्रोलची किंमत आता प्रति लिटर 100 रुपयांवर गेली आहे, सनी लिओनीने असा सल्ला दिला आहे जो तुमचे पॉकेट हलके होण्यापासून वाचवू शकणार नाही तर आरोग्याच्या दृष्टीकोनातून देखील उपयुक्त ठरणार आहे. सायकलसोबत फोटो शेअर करत सनी लिओनीने सांगितलं आहे की, आता सायकल चालविण्याची वेळ आली आहे.

या फोटोंत सनी लाल रंगाच्या कपड्यात दिसली असून तिने पांढर्‍या रंगाची सायकल घेतली आहे. हे फोटो शेअर करत सनीने लिहिलंय की, आता पेट्रोल 100 रुपयांच्या पुढे गेलं आहे, तर मग तुम्ही तुमच्या आरोग्याची काळजी घेतली पाहिजे.

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

चाहत्यांना आवडली सनीची स्टाईल 
त्याचवेळी चाहत्यांना सनी लिओनीची ही स्टाईल खूपच आवडली आहे. त्यामुळे सनीच्या या पोस्टवर कमेंन्टचा वर्षाव होत असल्याचं पहायला मिळत आहे.  जरी सनीचं सायकलवरचं प्रेम ही नवीन गोष्ट नाही, मात्र यापूर्वीही ती बर्‍याच वेळा सायकल चालवताना दिसली आहे. गेल्या आठवड्यात सनीला पती डॅनियलसह मुंबईच्या रस्त्यावर स्पॉट केलं गेलं होतं. ज्याचे फोटो सोशल मीडियावर खूप व्हायरल झाले. सनी फुल स्लीव्ह टॉप आणि ब्लॅक जिम वेयरमध्ये दिसली होती आणि तिच्यासोबत तिचा पती डॅनियल देखील होता. 

Read More