Marathi News> मनोरंजन
Advertisement

तुम्ही ओळखू शकता का 'या' अभिनेत्रीला? आज 'ती' तिच्या बोल्ड अभिनयाने करते लाखोंना घायाळ

गेल्या अनेक वर्षांपासून ती चित्रपटसृष्टीत आपली चमक दाखवत आहे. 

तुम्ही ओळखू शकता का 'या' अभिनेत्रीला? आज 'ती' तिच्या बोल्ड अभिनयाने करते लाखोंना घायाळ

मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री सनी लिओनी आज तिचा 41 वा वाढदिवस साजरा करत आहे. गेल्या अनेक वर्षांपासून ती चित्रपटसृष्टीत आपली चमक दाखवत आहे. आज सनी लिओनीच्या सौंदर्यावर करोडो लोकं तिच्यावर फिदा  आहेत. मात्र तिने आयुष्यात अनेक चॅलेंजला तोंड दिलं आहे.

आज ती ज्या स्थानावर आहे, त्यासाठी सनी लिओनीने खूप मेहनत घेतली आहे. त्याचबरोबर सोशल मीडियावर खूप सक्रिय असलेली सनी आज तिच्या कुटुंबियांसोबत वाढदिवस साजरा करत आहे. हा खास दिवस आणखी छान बनवण्यासाठी तिचा नवरा डॅनियल वेबरने तिच्यासाठी एक पोस्ट इंस्टाग्रामवर शेअर केली आहे.

डॅनियलने शेअर केला सनीचा जुना फोटो  
डॅनियल वेबरने त्याच्या सोशल मीडिया हँडलवर पत्नी सनी लिओनीचे दोन फोटो शेअर केले आहेत. पहिल्या फोटोत आपण तरुण आणि सुंदर करणजीत कौर वोहरा म्हणजेच सनी लिओनीला पाहू शकतो. तसंच, दुसऱ्या फोटोत सनीचं ट्रांसफॉर्मेशन स्पष्टपणे दिसत आहे.

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

दुसऱ्या फोटोमध्ये सनी शॉर्ट व्हाइट ड्रेस आणि मॅचिंग श्रगमध्ये खूपच हॉट दिसत आहे. डॅनियलने तिच्या इंस्टाग्राम पोस्टमध्ये सनीचं कौतुक करत लिहिलं की, 'हॅपी बर्थडे बेबी. माझ्याकडे शब्द नाहीयेत हे सांगाया की तू आता कोण झाली आहेस. तु आइकॉन आहेस आणि जेव्हा मला वाटतं की ते शक्य नाही तेव्हा तु अधिक अचिव्ह करतेस. खरंच तू एक अद्भुत व्यक्ती आहेस. देव दररोज आणि प्रत्येक वर्षी तुमची काळजी घेवो.

Read More