Marathi News> मनोरंजन
Advertisement

बहिणीचा फायदा घेत सनीचा भाऊ कमवत होता पैसे...

 या वेब सिरीजमध्ये सनीचा जीवनप्रवास उलघडला आहे. 

बहिणीचा फायदा घेत सनीचा भाऊ कमवत होता पैसे...

मुंबई : झी 5 वर बॉलिवूडची हॉट अभिनेत्री सनी लियोनीचा बायोपिक 'करनजीत कौर- द स्टोरी ऑफ सनी लियोनी' प्रदर्शित झाला आहे. या वेब सिरीजमध्ये सनीचा जीवनप्रवास उलघडला आहे. पार्न स्टार ते बॉलिवूड अभिनेत्रीपर्यंतचा तिचा प्रवास यात दाखवण्यात आला आहे. त्याचबरोबर तिच्या आयुष्यातील अनेक पैलू यात पाहायला मिळतात.

आणि ती बनली अडल्ट स्टार

परदेशात शाळेत शिकत असताना सनी लियोनीला बॉडी शेमिंगला बळी पडावे लागले होते. घराची खालावलेली आर्थिक परिस्थिती यामुळे तिला अडल्ट स्टार होण्याचा निर्णय घ्यावा लागतो. या वेब सिरीजमधील इट्स हॉट हे गाणे देखील लोकप्रिय ठरेल. नक्विता डिसूजाने आपल्या सुरेल आवाजात हे गीत गायले आहे. 

अन् ती झाली स्टार

यापूर्वी सनीचा एकुलता एक भाऊ संदीप वोहराचा एक किस्सा समोर आला. सनी आणि त्याचे नाते अत्यंत घनिष्ट असले तरी संदीप सनी लियोनीच्या प्रत्येक रहस्याचा साक्षीदार आहे. सनीने २०१३ मध्ये 'पेंटहाउस- पेट ऑफ द ईयर' हा पुरस्कार मिळवल्यानंतर अमेरिकेत तिचे फॅन फॉलोइंग जबरदस्त वाढले.

असा कमवायचा भाऊ पैसे

त्यावेळी सनीची एक ऑटोग्राफ घेण्यासाठी लोक आतूर असतं. पण सनीच्या भावासाठी हे अगदी सोपे होते. त्यामुळे तो तिची ऑटोग्राफ घेऊन आपल्या मित्रांना १०-१५ डॉलर म्हणजे सुमारे १००० रुपयांना विकत असे. 

fallbacks

Read More