Marathi News> मनोरंजन
Advertisement

सनी लिओनीचा कर्नाटकातील 'न्यू इयर पार्टी' प्लॅन फिसकटला

  नव वर्षाचं सेलिब्रेशन अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपलं आहे.

सनी लिओनीचा कर्नाटकातील 'न्यू इयर पार्टी' प्लॅन फिसकटला

मुंबई :  नव वर्षाचं सेलिब्रेशन अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपलं आहे.

सनी लिओनीनेदेखील नववर्षानिमित्त कर्नाटकामध्ये दाखल होणार होती. मात्र तिच्या सार्‍या प्लॅनिंगवर पाणी पडले आहे. 

पहा काय झाले ? 

सनी लिओनीचा कार्यक्रम  म्हणजे सांस्कृतिक हल्ला आहे. असे म्हणत कर्नाटकामध्ये ' कर्नाटक रक्षना वेदिके' युवा सेनेच्या कार्यकत्यांनी तीव्र निषेध नोंदवला होता. तसेच या कार्यकर्त्यांनी सनीचा कार्यक्रम झाल्यास आम्ही सामुहिक आत्महत्या करू असा इशारा दिला आहे.  या पार्श्वभूमीवर कर्नाटक पोलिसांनी या कार्यक्रमाला परवानगी देणं टाळलं होतं 

सनी लिओनीने केला खुलासा   

 

सनी लिओनीने ट्विटरच्या माध्यमातून नववर्षानिमित्त आयोजित कार्यक्रम रद्द झाल्याची घोषणा केली आहे. तसेच पोलिसांना माझी आणि उपस्थितांची सुरक्षा जपणं कठीण होत असल्याची परिस्थिती उद्भभवू शकते त्यामुळे  सुरक्षेचा विचार करता हा कार्यक्रम रद्द झाला आहे. अशा आशयाचे ट्विट केले आहे.   

तरूणांना दिला खास मेसेज 

 

कार्यक्रम रद्द झाल्यानंतर सनी लिओनीने तिच्या समर्थकांना आणि विरोधकांनादेखील खास संदेश दिला आहे. दोघांचेही आभार मानल्या नंतर तुमच्यासाठी इतर कोणाला बोलायला संधी देऊ नका. तसेच तुमची भूमिका स्वतः मांडा आपण या देशाचे तरूण आहोत त्यामुळे न्यू इंडिया आहोत.  

Read More