Marathi News> मनोरंजन
Advertisement

सनी लिओनीला ट्विटरवर मिळतेय धमकी, जाणून घ्या संपूर्ण प्रकरण

बॉलिवूड अभिनेत्री सनी लिओनी सोशल मीडियावर खूप अ‍ॅक्टिव असते

सनी लिओनीला ट्विटरवर मिळतेय धमकी, जाणून घ्या संपूर्ण प्रकरण

मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री सनी लिओनी सोशल मीडियावर खूप अ‍ॅक्टिव असते. ती तिच्या फोटोंनी आणि व्हिडिओंनी चाहत्यांचं मनोरंजन करते. नुकतीच सनीने सोशल मीडियावर एक फोटो पोस्ट केला होता, त्यानंतर तिला एका चाहत्याने धमकी दिली आहे. सनी लिओनीने 27 जून रोजी स्वतःचा एक फोटो ट्वीट केला होता. या फोटोमध्ये सनी खूप गोंडस दिसत होती. सनीच्या या फोटोवर लोकांनी बऱ्याच कमेंट केल्या आहेत. पण आज तिच्या एका चाहत्याने तिला चक्क धमकावलं आहे. वापरकर्त्याने लिहिलं आहे की, 'माझ्याकडे तुमचे काही व्हिडिओ आहेत, जर तुम्ही रिप्लाय दिला नाही तर मी तो व्हिडिओ व्हायरल करीन, हा माझा शब्द आहे आणि माझा शब्द माझा नियम आहे.' वापरकर्त्याचं हे ट्विट जोरदार व्हायरल होत आहे.

सनीचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे
नुकताच एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे ज्यामध्ये सनी लिऑन मुंबईच्या रस्त्यावर सायकल चालवताना दिसत आहे. तिच्यासोबत तिचा पती डॅनियल वेबर देखील आहे. सनी लिऑनच्या शेजारी फिरत असलेला फोटोग्राफर सनी लिओनीला आवाज देतो, त्यानंतर सनी त्याच्याकडे पाहते, त्यानंतर फोटोग्राफर सनी लिओनला सायकल थोडी हळू चालण्यास सांगतो.

सनीचे चित्रपट
वर्क फ्रंटबद्दल बोलायचं झालं तर, सनी लिऑन याआधी 'मोतीचूर चकनाचूर' चित्रपटात दिसली होती. लवकरच सनी दिग्दर्शक विक्रम भट्ट यांच्या 'अनामिका' चित्रपटात दिसणार आहे

Read More