Marathi News> मनोरंजन
Advertisement

सनी लिओनीने 'भरतनाट्यम' केल्यास कार्यक्रमाला परवानगी देऊ ..

अवघ्या काही दिवसांमध्ये २०१७ संपणार आहे.

सनी लिओनीने 'भरतनाट्यम' केल्यास कार्यक्रमाला परवानगी  देऊ ..

कर्नाटक  : अवघ्या काही दिवसांमध्ये २०१७ संपणार आहे.

ख्रिस्मस आणि त्यापाठोपाठ येणारं विकेंडला येणारे नववर्ष यामुळे अनेकांचे पार्टींचे प्लॅन्स तयार झाले आहेत. 
कर्नाटकामध्येही यंदा 'न्यू इयर सेलिब्रेशन'साठी अभिनेत्री सनी लिओनीचे कार्यक्रम आयोजित केले होते. मात्र स्थानिकांचा त्याला विरोध होत असल्याने तिच्या कार्यक्रमांना मंजुरी देण्यात आलेली नाही. 

कोणाचा वाढतोय विरोध  ? 

कन्नड़ संघटना, कर्नाटक रक्षा वेदिके सोबत अन्य काही संघटनांनी सनी लिओनीच्या कार्यक्रमांना विरोध केला आहे. कर्नाटकामध्ये सनीने कोणत्याही कार्यक्रमामध्ये सहभाग घेतल्यास त्या संध्याकाळी आम्ही सामुहिक आत्महत्या करू असा इशारा काही कार्यकर्त्यांनी दिला आहे.  

काय आहे भूमिका ? 

कर्नाटक रक्षा वेदिकेच्या म्हणण्यानुसार, सनीला आपल्या शहरात बोलावणं हा आपल्या संस्कृतीवर हल्ला आहे. गेल्या आठवड्याभरापासून या संघटना प्रखर विरोध करत आहेत. काही रॅलीचं आयोजन करण्यात आलं आहे. 

 
 भरतनाट्यम केल्यास परवानगी देऊ 

 
 सनीच्या कार्यक्रमाला विरोध आहे. मात्र सनी जर एखादा सांस्कृतिक कार्यक्रम किंवा भरतनाट्यम नृत्य  करणार असेल तर तिच्या कार्यक्रमाला परवानगी मिळू शकते. असे सांगण्यात आले आहे. 

Read More