Marathi News> मनोरंजन
Advertisement

दत्तक मुलीसोबत सनीचा पती जे वागला, 'हे' पाहून तुम्हीचं ठरवा दोघे चांगले पालक आहेत की नाही?

 बॉलिवूड अभिनेत्री सनी लिओनी आणि तिची मुलं नेहमीच सोशल मीडियावर चर्चेत असतात. पण आता...  

दत्तक मुलीसोबत सनीचा पती जे वागला, 'हे' पाहून तुम्हीचं ठरवा दोघे चांगले पालक आहेत की नाही?

मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री सनी लिओनी आणि तिची मुलं नेहमीच सोशल मीडियावर चर्चेत असतात. पुन्हा एकदा सनी लिओनी आणि तिच्या मुलांचा एक फोटो सोशल मीडियावर समोर आला आहे. जो तुफान व्हायरल होत आहे. ज्यामध्ये तिचा पती Daniel Webber ने मुलगी निशाचा हात थरला नव्हता. यामुळे तिला प्रचंड ट्रोल करण्यात आलं. 

सोशल मीडियावर ट्रोल करणाऱ्यांनी सनीने सडेतोड उत्तर दिलं आहे. ती म्हणाली, 'सोशल मीडियावर माझ्या कुटुंबाबद्दल लोक काय विचार करतात याचा मला काही फरक पडत नाही. पण माझा पती Daniel Webber या सर्व गोष्टींवर पूर्ण लक्ष ठेवून असतो.

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

'मला पतीला सतत सांगावं लागतं आपण आपल्या मुलांचा कसा सांभाळ करतो, हे कोणाला सांगण्याची गरज नाही. आम्हाला माहिती आहे आम्ही आमच्या मुलांचा सांभाळ कसा करतो.'

ती पुढे म्हणाली, 'ट्रोल करणारे लोक आमच्या घरात जेवण बनवत नाहीत. आमच्या मुलांचा सांभळ करत नाहीत. आमच्या मुलांसोबत खेळत नाहीत. फक्त एक फोटो सांगू शकत नाही आम्ही कसे पालक आहोत...'

सनीच्या कामाबद्दल सांगायचं झालं तर, ती लवकरचं दाक्षिणात्य सिनेसृष्टीत आपलं नशीब आजमावताना दिसणार आहे. एवढंच नाही तर तिने ओटीटी प्लॅटफॉर्मवर देखील पदार्पण केलं आहे. 

Read More