Marathi News> मनोरंजन
Advertisement

अरबाज खानच्या एका प्रश्नावर ढसा-ढसा रडू लागली सनी लिओनी

अरबाज खानचा तो एक प्रश्न आणि ढसा-ढसा रडू लागली सनी लिओनी  

अरबाज खानच्या एका प्रश्नावर ढसा-ढसा रडू लागली सनी लिओनी

मुंबई : अभिनेत्री सनी लिओनी सध्या तिच्या 'मधुबन' गाण्यामुळे चर्चेत आहे. सनीचं गाणं गेल्या काही दिवसांपासून वादाच्या भोवऱ्यात सापडलं आहे. सनीने 'जिस्म' चित्रपटाद्वारे बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. सनीने तिच्या मेहनतीच्या जोरावर वेगळी ओळख निर्माण केली आहे. सनी सोशल मीडियावर खूप सक्रिय असते. सोशल मीडियावर तिच्या चाहत्यांची संख्या देखील फार मोठी आहे. एवढंच नाही तर ती कोणत्याही विषयावर मनमोकळेपणाने बोलते. 

पण एकदा सनीला तिच्या भूतकाळाशी संबंधित अशा प्रश्नाला सामोरे जावे लागले, जे ऐकताच सनीचे डोळे भरून आले. एकदा सनी सलमानचा भाऊ अरबाजच्या टॉक शो 'द पिंच'मध्ये पोहोचली होती. शोमध्ये अरबाज खान सोशल मीडियावर उपस्थित केलेले काही प्रश्न पाहुण्यांसमोर ठेवतो. 

अरबाजने सनी लिओनीला अनेक मजेशीर प्रश्न विचारले. आणि त्याने सगळ्यांना मोठ्या बिनधास्तपणे उत्तर दिलं. दरम्यान, सनीची जुनी पोस्ट पाहून अरबाजने तिच्या भूतकाळाशी संबंधित प्रश्न विचारला, अरबाजने तिच्या एका जुन्या पोस्टबद्दल एक प्रश्न विचारला ज्यामध्ये सनीने एका व्यक्तीसाठी चाहत्यांकडून मदत मागितली होती. 

ज्यासाठी लोकांनी सनीला खूप ट्रोल केले. ज्या व्यक्तीसाठी सनीने मदत मागितली होती तो म्हणजे तिचा भाऊ प्रभाकर. सनीने चाहत्यांना त्याच्या उपचारासाठी मदतीची मागणी केली. अरबाज खानने जेव्हा सनीला हा प्रश्न विचारला तेव्हा सनी भावूक झाली आणि ती ढसा-ढसा रडू लागली. 

सनी म्हणाली, 'प्रभाकरला तिची दत्तक मुलगी निशाने मामा म्हणून हाक मारली आणि अशा प्रकारे तो तिचा भाऊ बनला." यासाठी प्रभाकरच्या उपचारासाठी सनीने लोकांकडे मदत मागितली. त्यानंतर सनीने आम्ही प्रभाकरला वाचवू शकलो नाही असे म्हणत तिने रडायला सुरुवात केली.'

Read More