Marathi News> मनोरंजन
Advertisement

सनी लियोनी करणार स्पलिट्सविला सीजन ११ चे होस्टिंग...

 बॉलिवूडची हॉट आणि बोल्ड अभिनेत्री सनी लियोनी तिच्या बोल्डनेसमुळे सतत चर्चेत असते.

सनी लियोनी करणार स्पलिट्सविला सीजन ११ चे होस्टिंग...

मुंबई : बॉलिवूडची हॉट आणि बोल्ड अभिनेत्री सनी लियोनी तिच्या बोल्डनेसमुळे सतत चर्चेत असते. मात्र आता चर्चा होण्याचे कारण वेगळे आहे. बॉलिवूडची ही बेबी डॉल महिनाभर उत्तराखंडच्या जंगलांमध्ये काम करणार आहे. एम टी.व्ही. वर प्रसारित होणाऱ्या स्पलिट्सविला सीजन ११ ची शूटिंग रामनगरमध्ये सुरु आहे. १ जूनपासून या कार्यक्रमाचे शूटिंग सुरु होणार आहे. मात्र या कार्यक्रमाबद्दल कमालीची गोपनीयता बाळगण्यात आली आहे. 

सनी करणार हे काम

यात बॉलिवूड अभिनेत्री सनी लियोनी आणि बॉलिवूड अभिनेता रणविजय शो चे होस्टिंग करणार आहे. उत्तराखंडच्या छोईत द बॅनियन रिट्रीटमध्ये स्पलिट्सविला सीजन-११ चा पूर्ण सेटअप तयार आहे.

शो चे शूटिंग 

शो साठी १५० लोकांचा क्रू आहे. रिसोर्टच्या आजूबाजूला असलेला जंगली भागात या शो चे शूटिंग सुरु आहे. हे १ ते ३० जूनपर्यंत चालेल. यानंतर कुमेरिया जिल्ह्यातील अल्मोडात आणि त्याच्या आजूबाजूच्या प्रदेशात शूटिंग होणार आहे. 

 

Read More
;