Marathi News> मनोरंजन
Advertisement

तीन मुलांसह पहिल्यांदाच स्पॉट झाली सनी लियोनी...

सनी लियोनीने काही दिवसांपूर्वी सरोगसीद्वारे जुळ्या मुलांची आई झाली. 

तीन मुलांसह पहिल्यांदाच स्पॉट झाली सनी लियोनी...

मुंबई : सनी लियोनीने काही दिवसांपूर्वी सरोगसीद्वारे जुळ्या मुलांची आई झाली. पण त्यानंतर पहिल्यांदाच तिला आपल्या तिन्ही मुलांसोबत एकत्र स्पॉट करण्यात आले. १३ मे च्या रात्री पती डेनियल वेबर आणि तिन्ही मुलांसह तिला स्पॉट करण्यात आले. सनी लियोनीच्या संपूर्ण कुटुंबाचे फोटोज व्हायरल होत आहेत. एका बाळाला सनीने उचलून घेतले होते तर दुसरे बाळ बेबी प्रॅम्समध्ये होता. तर मुलगी निशा आपल्या वडीलांसोबत होती. सर्वचजण आनंदी दिसत होते.

fallbacks

जुळ्या मुलांची बातमी सनीने सोशल मीडियाद्वारे आपल्या चाहत्यांना दिली. अशर सिंग वेबर आणि नोआ सिंग वेबर या दोन मुलांची आई झाल्याने ती अत्यंत खूश आहे. १३ मे ला आपला ३७ वा वाढदिवस साजरा करण्यासाठी परिवारासह दुबईला गेलेली सनी काल रात्री उशिरा मुंबईत परतली.

fallbacks

fallbacks

सनीने एका मुलाखतीत सांगितले की, तिला नेहमीच ३ मुले हवी होती. आणि या इच्छापूर्तीमुळे सनी आणि पती डेनियल वेबर अत्यंत खूश आहे. जून २०१७ मध्ये त्यांनी मुलगी निशाला दत्तक घेतले आणि यावर्षी मार्चमध्ये ती सरोगसीद्वारे दोन मुलांची आई झाली.

fallbacks

सनी लियोनी सोशल मीडियावर आपल्या मुलांचे फोटोज शेअर करत असते. 

fallbacks

fallbacks

सनी आणि डेनियलचे सुखी, आनंदी कुटुंब.

fallbacks

Read More
;