Marathi News> मनोरंजन
Advertisement

सनी लियोनी ३७ वर्षांची, २ कारणांमुळे वाढदिवस ठरतोय स्पेशल

बॉलीवुड अभिनेत्री सनी लियोनी आज ३७ वर्षांची झाली. १३ मे १९८१ ला सनीने स्वत: ची ओळख निर्माण केली आहे.

सनी लियोनी ३७ वर्षांची, २ कारणांमुळे वाढदिवस ठरतोय स्पेशल

नवी दिल्ली : बॉलीवुड अभिनेत्री सनी लियोनी आज ३७ वर्षांची झाली. १३ मे १९८१ ला सनीने स्वत: ची ओळख निर्माण केली आहे. पोर्न स्टार ते बॉलीवुड अभिनेत्री असा प्रवास करणाऱ्या सनीसाठी हा वाढदिवस खूप खास आहे. कारण आपल्या वाढदिवसासोबतच ती आपला पहिला मदर्स डे ही साजरा करणार आहे. सनी ३ मुलांची आई आहे. यामध्ये एक मुलगी तर दोन मुलगे आहेत.  तीनही मुलांना घेऊन ती आज पहिला मदर्स डे साजरा करत आहे. सनी आणि डेनियल वेबरने २०११ मध्ये लग्न केल. निशा त्यांची पहिली मुलगी आहे. दत्तक घेऊन २१ महिन्यांच्या मुलीचं नाव निशा कौर वेबर असं ठेवण्यात आलं आहे. मार्च २०१८ मध्ये सरोगसीद्वारे २ जुळ्या मुलांच्या जन्माची आनंदाची बातमी दिली. तिने आपल्या पूर्ण फॅमिलीचा फोटो सोशल मीडियावर पोस्ट केला.

ज्यामध्ये पती डॅनियल वेबर, मुलगी निशा आणि दोन जुळी मुल अशर सिंह वेबर आणि नोआ वेबर यांचा समावेश आहे. 

Read More