Marathi News> मनोरंजन
Advertisement

टॉपलेस मिलिंद सोमनला पाहून मलायका अर्जुन कपूरला ही विसरली?

मिलिंद सोमण पुन्हा एकदा चर्चेत आला आहे.

टॉपलेस मिलिंद सोमनला पाहून मलायका अर्जुन कपूरला ही विसरली?

मुंबई : मिलिंद सोमण पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. मिलिंद एमटीव्ही शो सुपरमॉडेल ऑफ द इयर 2 मध्ये रॅम्प वॉक केल्यामुळे चर्चेत आला आहे. परिक्षक मलायका अरोरा आणि मिलिंद सोमण प्रत्येक आठवड्यात शोमध्ये नवीन अवतारात दिसतात. आता मिलिंद सोमणने 26 वर्षांनंतर जबरदस्त रॅम्प वॉक सादर केला आहे. सुपरमॉडेल ऑफ द इयर 2 या शोचा एक नवीन प्रोमो समोर आला आहे, ज्यामध्ये मिलिंद सोमण धोती घालून रॅम्पवर चालताना दिसत आहे.

या प्रोमोमध्ये स्पर्धक मिलिंद सोमणसोबत पोज देतानाही दिसत आहेत. त्याचवेळी मलायका अरोरा तिची स्टाईल पाहून आश्चर्यचकित झाली आणि लाजली. मलायका ही मिलिंदच्या या लूकवर फिदा झाली.

मिलिंद सोमणनेही त्याचा व्हिडिओ इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. त्याने कॅप्शनमध्ये लिहिले, 'आणि 26 वर्षांनंतर ... पुन्हा एकदा.'

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

मिलिंदच्या या धोती लूकचे खूप कौतुक होत आहे. मिलिंद सोमण यांचे सॉल्ट एंड पेपर हेअर लूक फॅन्सना आवडत आहे. 26 वर्षापूर्वी मिलिंद सोमणने मेड इन इंडिया गाण्यात हा लूक केला होता.

 

Read More