Entertainment News : हिंदी सिनेजगताची लोकप्रियता संपूर्ण जगात असली तरीही या कलाजगताच्या लोकप्रियतेला शह दिला तो म्हणजे दाक्षिणात्य कलाजगतानं. एकाहून एक सरस कलाकार असणाऱ्या या दाक्षिणात्य कलाविश्वामध्ये अतिशय मानानं नाव घेतलं जातं ते म्हणजे सुपरस्टार रजनीकांत यांचं.
हिंदी चित्रपट विश्वानंतर दक्षिणेकडे आपला मोर्चा वळवून तेथील प्रेक्षकांच्या मनावर आपल्या अभिनय आणि अनोख्या शैलीचा ठसा रजनीकांत यांनी उमटवला. चित्रपटात या सुपरस्टारचं नाव जोडलं म्हणजे तो प्रदर्शनाआधीच सुपरहिट ठरला असं जणू अलिखित समीकरणच आहे असंही म्हटलं जातं. पण, एका कलाकारानं नुकतंच केलेलं वक्तव्य इथं अपवाद ठरत आहे. फक्त अपवाद नव्हे, अनेकांच्या भुवया उंचावून जात आहे.
दाक्षिणात्य सिनेविश्वातील एक गाजलेलं नाव अभिनेता विष्णू विशाल यानं नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीदरम्यान आपल्या ‘लाल सलाम’ या चित्रपटाला मिळालेल्या अपयशासंदर्भातील वक्तव्य केलं. सुरुवातीला या चित्रपटात आपण मध्यवर्ती कलाकार होतो आणि रजनीकांत (Rajinikanth) यांची त्यात पाहुणे कलाकारांची भूमिका होती. मात्र नंतर रजनीकांत यांची भूमिका वाढवण्यात आली ज्यामुळं चित्रपटातील आपली भूमिका कमी झाल्याचा दावा विष्णू विशालनं केला.
विष्णू विशालच्या माहितीनुसार चित्रपटात शेवटच्या क्षणी झालेल्या या बदलांमुळंच तो बॉक्स ऑफिसवर सपशेल अपयशी ठरला आणि प्रेक्षकांनी या चित्रपटाकडे पाठ फिरवली. सुरुवातीला प्रेक्षक रजनीकांत यांच्या भूमिकेला दणदणून प्रतिसाद देतील असं आम्हा सर्वांनाच वाटलं मात्र दुर्दैवानं तेच चित्रपटाच्या अपयशाचं कारण ठरलं असं स्पष्ट वक्तव्य विष्णू विशालनं केलं.
'लाल सलाम' हा एक स्पोर्ट्स ड्रामा असूव त्यात अभिनेता विष्णू विशाल आणि विक्रांत यांच्या मुख्य भूमिका होत्या. तर, रजनीकांत त्याच ‘मोइदीन भाई’ ही छोटेखानी भूमिका बजारवणार होते. मात्र त्यानंतर या भूमिकेला अधिक स्क्रीन टाईम देण्यात आला आणि चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतरही रजनीकांत यांच्या या भूमिकेवर अनेक प्रश्न उपस्थित करण्यात आले होते.
#VishnuVishal about #LalSalam
— Movie Tamil (@MovieTamil4) July 9, 2025
- It was my film, #Rajinikanth sir was supposed to do only 25 Mins.
- That changed a little, but as a Thalaivar fan I am very happy.pic.twitter.com/8ZE1RGOIBx
2024 मध्ये प्रदर्शित झालेला 'लाल सलाम' हा तामिळ चित्रपट प्रदर्शित झाला होता. रजनीकांत यांची मुलगी ऐश्वर्या हिनं या चित्रपटाचं दिग्दर्शन केलं होतं. 80 ते 90 कोटींच्या निर्मितीखर्चात साकारलेल्याया चित्रपटानं 19 कोटी 76 लाख इतकीच कमाई केली, ज्यामुळं त्याची गणती फ्लॉप चित्रपटांमध्ये करण्यात आली.