Marathi News> मनोरंजन
Advertisement

'त्यानं पॅन्टमधून काही बाहेर काढलं आणि...', Surveen Chawla नं सांगितला बालपणीचा 'तो' धक्कादायक किस्सा

Surveen Chawla Faced Harassment as a Child : अभिनेत्रीनं नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत धक्कादायक किस्सा शेअर केला आहे. 

'त्यानं पॅन्टमधून काही बाहेर काढलं आणि...', Surveen Chawla नं सांगितला बालपणीचा 'तो' धक्कादायक किस्सा

Surveen Chawla Faced Harassment as a Child : छोट्या पडद्यावरून आपल्या अभिनयाच्या जोरावर बॉलिवूडमध्ये स्थान मिळवणारी अभिनेत्री सुरवीन चावला आज वेगवेगळ्या प्रोजेक्ट्सचा भाग राहिली आहे. प्रत्येक भूमिकेला तिने प्रेक्षकांसमोर अत्यंत प्रभावीपणे साकारले आहे. मात्र, यावेळी सुरवीन तिच्या एखाद्या सिनेमामुळे नाही, तर एका भावनिक आणि धक्कादायक इंटरव्ह्यूमुळे चर्चेत आली आहे. या मुलाखतीत तिने कास्टिंग काउचबद्दल तिच्या आयुष्यात घडलेले काही अनुभव शेअर केले. जे खूपच अस्वस्थ करणारे होते.

सुरवीननं ‘हॉटरफ्लाय’च्या 'द मेल फेमिनिस्ट' या कार्यक्रमात दिलेल्या इंटरव्ह्यूमध्ये सांगितलं, 'हे खूप वर्षांपूर्वी घडलं. मी तेव्हा 9वीत शिकत होते. एक दिवस संध्याकाळी मी खेळायला बाहेर गेले होते. मला अजूनही आठवतं, एक सावळ्या रंगाचा, पगडी घातलेला सरदार सायकलवरून आला. त्यानं मला जवळ बोलावलं आणि मी त्याच्याकडे चालत गेल्यावर पाहिलं की तो त्याच्या पँटमधून काहीतरी बाहेर काढत होता. त्यानंतर त्यानं सायकलवर बसून अत्यंत घाणेरडं कृत्य केलं. मी लगेच तिथून उलटं फिरले आणि धावत घरी आले.'

पुढे सुरवीन म्हणाली, "तेव्हा मला नीट असं काही समजलं नव्हतं की काय चाललं आहे, पण काहीतरी चुकीचं होतं, हे मला जाणवलं. त्यामुळे मी त्याच्याकडे गेलेच नाही. पण ही घटना माझ्या मनावर खोल परिणाम करून गेली. अशा प्रकारच्या गोष्टी मुलींच्या मनात एक कायम भीतीचा भाव निर्माण करतात. त्या क्षणी त्या लहान असतात, काही उमगत नाही, पण त्या आठवणी कायम मनात घर करून राहतात."

हेही वाचा : जेव्हा ईशा देओलसाठी धर्मेंद्रंच्या पहिल्या पत्नी शोधत होत्या वर; तरी लग्नात पोहोचल्या नाही...

सुरवीननं कास्टिंग काउचबाबतही एक किस्सा शेअर केला. ती म्हणाली, "माझं लग्न झालं होतं आणि मी मुंबईच्या वीरा देसाई रोडवर एका दिग्दर्शकासोबत मीटिंगसाठी गेले होते. त्या मीटिंगमध्ये आम्ही माझ्या नवऱ्याबद्दलही बोललो. पण जेव्हा मी निघत होते, तेव्हा तो दिग्दर्शक मला गेटपर्यंत सोडायला आला आणि अचानक माझ्या दिशेनं वाकत त्यानं किस करण्याचा प्रयत्न केला. मी लगेच त्याला मागे ढकललं आणि विचारलं, ‘तुम्ही हे काय करताय?’ आणि तिथून निघून गेले. हा माझ्यासाठी खूप मोठा धक्का होता."

अशा घटना उघड होत नाहीत

सुरवीन म्हणाली की, "इंडस्ट्रीत अशा अनेक घटना घडतात. कास्टिंग काउच आणि अशिष्ट वागणूक. पण अनेक वेळा या गोष्टी भीती आणि धमकीमुळे लोक समोर आणत नाहीत किंवा पोलिसांत तक्रारही करत नाहीत. हे फार त्रासदायक आहे आणि बराच काळापासून सुरु असलेलं वास्तव्य आहे.

Read More