मुंबई : बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंह राजपूतने आत्महत्या केली आहे. मुंबईच्या राहत्या घरी गळफास लावून सुशांत सिंह राजपूतने आत्महत्या केली आहे. सुशांतच्या मदतनीसाने ही बातमी पोलिसांना दिल्याची माहिती मिळत आहे. सुशांत सिंहच्या एक्स मॅनेजरने देखील ९जून रोजी आत्महत्या केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.
एक्स मॅनेजर दिशा सलियनने इमारतीवरून उडी मारून आत्महत्या केल्याचा प्रकार उघडकीस आला होता. दिशा आपल्या जोडीदारासोबत मालाडमध्ये राहत होती. दिशाने आपल्या राहत्या घराच्या १४ व्या माळ्यावरून आत्महत्या केली आहे. ही घटना काही दिवसांपूर्वीच घडली असताना आता सुशांत सिंहच्या आत्महत्येची घटना घडली आहे.
बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंह राजपूतने केली आत्महत्या....
— ZEE २४ तास (@zee24taasnews) June 14, 2020
आत्महत्येचं कारण अद्याप अस्पष्ट https://t.co/HOK58ckddW#SushantSinghRajput @ashish_jadhao pic.twitter.com/mW2fES5g1C
सुशांत सिंह राजपूतच्या आत्महत्येचं कारण अद्याप अस्पष्ट आहे. मात्र सुशांतने एवढ्या टोकाचं निर्णय का घेतला? हाच प्रश्न साऱ्यांना सतावत आहे. सुशांत सिंह राजपूज 'पवित्र रिश्ता' या मालिकेतून घराघरात पोहोचला. त्यानंतर महेंद्र सिंह धोनीच्या सिनेमामुळे सुशांत सिंह राजपूतला अधिक लोकप्रियता मिळाली.