नवी दिल्ली : सुशांत सिंह राजपूतने रविवारी घरात गळफास घेऊन आत्महत्या केली. वयाच्या 34 व्या वर्षी सुशांतचे निघून जाणे बॉलिवूडमधील कलाकारांना आणि त्याच्या चाहत्यांना धक्का देणारे होते. मीडिया रिपोर्टनुसार सुशांत सिंह राजपूत गेल्या 6 महिन्यांपासून नैराश्याचा बळी होता. सोशल मीडियावर सुशांतचे चाहते प्रश्न करत आहेत की सुशांत सिंगच्या आत्महत्येस दोषी कोण आहे? करण जौहर, आलिया भट्ट यांच्यानंतर सलमान खानवरही लोकं रोष व्यक्त करत आहेत.
ट्विटरवर सलमान खान ट्रेंड करत आहे. 14 जून रोजी सुशांत सिंह राजपूतच्या आत्महत्येची बातमी आली तेव्हा बॉलिवूड, राजकीय आणि क्रीडा क्षेत्रातील लोकांनी त्यांच्या मृत्यूवर शोक व्यक्त केला. सलमान खानने आपल्या ट्विटरद्वारे सुशांतच्या आत्म्यास शांती मिळावी अशी प्रार्थना केली. पण ट्विटरवर आता सलमान खानची एक मुलाखत ट्रेंड करतेय ज्यामध्ये जॅकलिन फर्नांडिस आणि सुशांत सिंह राजपूत यांच्यासोबत आपण एखादा चित्रपट बनवत आहे का असा प्रश्न सलमानला विचारण्यात आला होता. यावर सलमान खान म्हणाला होता की, सुशांत सिंह राजपूत कोण आहे? मग त्याला सांगण्यात आले की महेंद्रसिंह धोनीची भूमिका साकारणार्या 'एमएस धोनी द अनटोल्ड स्टोरी' चा अभिनेता.
Dear #SalmanKhan Haters...Do Whatever You Want To Do Man...End Of It...You Will Find Salman Khan Always On Top Standing Like Rock...
— Kalpesh (@KalpeshTweets) June 16, 2020
We Fans Are With Him... pic.twitter.com/W6IKxgC9xW
सलमान खानच्या या जुन्या मुलाखतीवर सुशांत सिंह राजपूतच्या चाहत्यांनी आता सोशल मीडियावर रोष व्यक्त करायला सुरुवात केली आहे. सलमान खानच्या आधी करण जोहर आणि आलिया भट्ट विरोधात देखील लोकांना राग व्यक्त केला.
सलमान खानचे चाहते देखील त्याच्या समर्थनार्थ सतत ट्विट करत आहेत. त्यांचे म्हणणे आहे की सलमानने सर्वांना मदत केली आहे. सुशांत सिंग आणि सलमान खानचा एक डान्स व्हिडिओ सोशल मीडियावरही व्हायरल होत आहे. त्याचवेळी लोक असेही म्हणत आहेत की सुशांत सिंह राजपूत आणि सारा अली खान जेव्हा 'बिग बॉस' दरम्यान 'केदारनाथ' प्रमोशनसाठी आले होते तेव्हा सलमान खान या दोघांसोबत खूप चांगला प्रकारे बोलला होता. इतकेच नाही तर सलमानने सुशांतला 'केदारनाथ'साठी शुभेच्छा दिल्या होत्या.
#SalmanKhan
— Aditya (@Akhandadi07) June 16, 2020
Stop Targeting pic.twitter.com/FkEoz8o9Z7