Marathi News> मनोरंजन
Advertisement

रायफलमॅन Teaser : विक्की कौशलनंतर आता सुशांतही बनलाय फौजी

मंगळवारी रात्री सुशांतनं आपल्या आगामी सिनेमाचा अर्थात रायफलमॅनचा टीझर लॉन्च केला

रायफलमॅन Teaser : विक्की कौशलनंतर आता सुशांतही बनलाय फौजी

मुंबई : सध्या बॉक्स ऑफिसवर अभिनेता विक्की कौशलच्या 'उरी : द सर्जिकल स्ट्राईक'चा धुमाकूळ दिसतोय. अशावेळी आणखी एक अभिनेता फौजीच्या रुपात प्रेक्षकांसमोर येण्यास सज्ज झालाय... 'रायफलमॅन' या सिनेमामध्ये अभिनेता सुशांत सिंह राजपूत एका फौजीच्या भूमिकेत दिसणार आहे, हे आता स्पष्ट झालंय. मंगळवारी रात्री सुशांतनं आपल्या आगामी सिनेमाचा अर्थात रायफलमॅनचा टीझर लॉन्च केला. 

'सोन चिडिया' या सिनेमात डाकू बनलेला सुशांत सिंह राजपूत रायफलमॅनमध्ये एका सेनेच्या जवानाच्या भूमिकेत दिसणार आहेत. नुकतंच सुशांतनं आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून आपल्या आगामी सिनेमाचा आनंद आपल्या फॅन्ससोबत शेअर केलाय. 

काही दिवसांपूर्वी सुशांत एकाच वेळी १२ सिनेमे मिळाल्याची माहिती देऊन चर्चेत आला होता. 

'सेना दिवसा'चं निमित्त साधत 'रायफलमॅन'चा टीझर प्रदर्शित करण्यात आला. या पोस्टमध्ये सुशांतनं लिहिलंय 'एक अग्रेसर शत्रू. सीमेचा बचाव. एक बहाद्दर... सेना दिवसाला आपल्या आगामी सिनेमाची - रायफलमॅनची घोषणा करताना मी उत्साहीत आहे'.

हा टीझर प्रदर्शित करण्याच्या एक दिवस अगोदर सुशांतनं सोशल मीडियावर एक व्हिडिओ शेअर केला होता. या व्हिडिओत सुशांत भारतीय सैनिकांसोबत ट्रेनिंग घेताना दिसतोय. अर्थातच, या सिनेमाच्या तयारीसाठी सुशांतनं कंबर कसलीय, हे दिसतंय. 

सध्या सुशांत आपल्या 'सोन चिडिया' या सिनेमाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे. या सिनेमात त्याच्यासोबत भूमी पेडणेकर, रणवीर शौरी, मनोज वाजपेयी आणि आशुतोष राणा मुख्य भूमिकेत दिसतील. यापूर्वी सुशांत केदारनाथमध्ये सारा अली खान हिच्यासोबत दिसला होता.

Read More