Marathi News> मनोरंजन
Advertisement

#SushantSinghRajput : शाळेकडून भावनिक पोस्टद्वारे आदरांजली

सुशांतच्या शाळेने त्याचा फोटो शेअर करत भावनिक पोस्ट लिहिली आहे.

#SushantSinghRajput : शाळेकडून भावनिक पोस्टद्वारे आदरांजली

मुंबई : बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या निधनानंतर सर्वांनाच मोठा धक्का बसला आहे. सुशांतच्या निधनाला 10 दिवस उलटून गेले तरी आजही अनेक कलाकार, चाहते या धक्क्यातून बाहेर आलेले नाही. अनेक जण सुशांतच्या आठवणींना उजाळा देत अनेक फोटो, पोस्ट शेअर करत आहेत. सुशांतच्या शाळेनेही त्याला श्रद्धांजली वाहिली आहे. सुशांतने पटनाच्या सेंट कॅरन्स हायस्कूलमधून त्याचं शालेय शिक्षण केलं होतं. सुशांतच्या शाळेने त्याचा फोटो शेअर करत त्याच्या आठवणीत एक भावनिक पोस्ट शेअर केली आहे.

पटनाहून आलेल्या सुशांतने मुंबईत येऊन उत्तम अभिनेता म्हणून नाव कमावलं. सुशांत एक उत्तम अभिनेताच नाही तर तो एक हुशार विद्यार्थीही होता. यशाच्या शिखरावर असताना सुशांतचं या जगातून जाणं अनेकांच्या मनाला चटका लावून गेलं. 

सुशांतने 14 जून रोजी वांद्र्यातील त्याच्या राहत्या घरी गळफास लावून आत्महत्या केली. मिळालेल्या माहितीनुसार, सुशांत गेल्या 6 महिन्यांपासून डिप्रेशनमध्ये असल्याचं बोललं जातं. सुशांतवर डिप्रेशनसाठी इलाजही सुरु होता. सुशांतच्या आत्महत्येप्रकरणी पोलिसांकडून सखोल चौकशी करण्यात येत आहे. पोलीस सुशांतच्या जवळच्या नातेवाईक, मित्रमंडळीची चौकशी करत आहेत. आतापर्यंत 20हून अधिक जणांचे जबाब नोंदविण्यात आले आहेत. मात्र अद्याप पोलिसांना आत्महत्येमागचं ठोस कारण आढळलेलं नाही. 

 

Read More