Marathi News> मनोरंजन
Advertisement

बॉलीवूडचा धोनी लवकरच अडकणार विवाहबंधनात

बॉलीवूडचं आणखी एक कपल अडकणार विवाहबंधनात

बॉलीवूडचा धोनी लवकरच अडकणार विवाहबंधनात

मुंबई : बॉलीवूड अभिनेत्री सोनम कपूर बॉयफ्रेंड आनंद अहूजासोबत विवाहबंधनात अडकणार आहे. पण आता यानंतर बॉलीवूडचं आणखी एक कपल विवाहबंधनात अडकणार आहे. छोट्या पडद्यावरुन मोठ्या पडद्यावर आलेल्या सुशांत सिंह राजपूत आणि अभिनेत्री कृती सेनन अनेक दिवसांपासून रिलेशनशिप आहेत. दोघांनी कधीही याबाबत खुलासा केला नाही. पण आता अशी माहिती येते आहे की, दोघेही लवकरच विवाह करणार आहेत.

fallbacks

टाइम्स नावच्या रिपोर्टनुसार कृती सेननच्या आई-वडिलांना सुशांत सिंहच्या घराबाहेप पाहिलं गेलं होतं. त्याच दिवशी कृती आणि सुशांत मनीष मल्होत्राच्या घरी एकत्र पाहिलं गेलं होतं. बॉलीवूडच्या एका फोटो जर्नलिस्टने दोघांचे फोटो इंस्टाग्रामवर शेअर केले होती. बॉलीवूडचे अनेक कपल्स आपल्या नात्यांबद्दल कधीही सार्वजनिकपणे बोलत नाहीत. लग्नाच्या काही दिवसाआधी ते याची माहिती देतात.

fallbacks

विराट कोहली आणि अनुष्का शर्मा, सोनम कपूर आणि आनंद अहूजा प्रमाणेच कृती आणि सुशांतचा विवाह देखील बॉलीवूडमध्ये चर्चेचा विषय आहे. याआधी देखील सुशांत कृतीच्या कुटुंबियांना भेटला होता. पण आम्ही दोघेही चांगले मित्र असल्याचं या दोघांनी आतापर्यंत म्हटलं आहे.

सुशांत लवकरच 'केदारनाथ'मध्ये सारा अली खानसोबत दिसणार आहे. याशिवाय तो 'सोन चिरैया', 'चंदा मामा दूर के' आणि 'ड्राइव्ह' सिनेमांमध्ये दिसणार आहे. कृती सेनन लवकरच 'फर्जी' सिनेमामध्ये दिसणार आहे.

Read More