Marathi News> मनोरंजन
Advertisement

आईसाठी सुशांत सिंह राजपूतची शेवटची इमोशनल पोस्ट

आज सुशांत सिंह राजपूतच्या निधनाने अनेकांना धक्का बसला आहे.

आईसाठी सुशांत सिंह राजपूतची शेवटची इमोशनल पोस्ट

मुंबई : आज सुशांत सिंह राजपूतच्या निधनाने अनेकांना धक्का बसला आहे. त्याच्या आत्महत्येच्या बातमीने अनेकांना धक्का बसला आहे. एका जाहिरातीपासून ते सिनेमापर्यंतचा प्रवास सुशांतने यशस्वीपणे पार पाडला होता. पण आज त्याने गळफास घेऊन आपलं जीवन संपवलं. त्याने आत्महत्या का केली हे अजून पुढे आलेलं नाही. तो गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर ही अॅक्टीव्ह दिसत नव्हता. ३ जूनला त्याने एक इन्स्टाग्रामवर एक पोस्ट केली होती. जी त्याने त्याच्या आईसाठी लिहिली होती. 

सुशांतने ३ जून रोजी केलेल्या शेवटच्या पोस्टमध्ये त्याच्या आईचा फोटो शेअर केला आहे. शेवटच्या इन्स्टाग्राम पोस्टमध्ये तो त्याच्या आयुष्याची व्याख्या करताना दिसत होता आणि आपल्या आईची आठवण काढत होता. सुशांतने त्याच्या आईचा एक जुना फोटो शेअर केला होता. सुशांत यशस्वी होण्याआधीच त्याच्या आईचं निधन झालं होतं. ही गोष्ट त्याला नेहमी दु:खी करायची. की त्याच यश पाहण्यासाठी त्याची आई आता त्याच्या सोबत नाही.

सुशांत आईचं निधन झालं आहे. तो त्याच्या आईच्या खूप जवळ होता. अनेकदा त्याने आपल्या आई बद्दल सोशल मीडियावर प्रेम व्यक्त केलं होतं.

Read More