Marathi News> मनोरंजन
Advertisement

Sushant Suicide Case: 'दिल बेचरा' फेम अभिनेत्रीची पोलिसांकडून चौकशी

सुशांत सिंह राजपूतने अगदी कमी कालावधीत आपल्या अभिनयाने चाहत्यांच्या मनात घर केलं.  

Sushant Suicide Case: 'दिल बेचरा' फेम अभिनेत्रीची पोलिसांकडून चौकशी

मुंबई : अभिनेता सुशांतसिंग राजपूत याने आत्महत्या केल्यानंतर आता त्यामागची कारणे शोधण्याचा पोलीस प्रयत्न करत आहेत. या साऱ्यामध्येच मुंबई पोलिसांनी सुशांतच्या आत्महत्येचं खरं कारण शोधण्यासाठीचा तपासही सुरु केला. ज्या धर्तीवर आतापर्यंत जवळपास २७ जणांचा जबाब नोंदवण्यात आला आहे. दरम्यान 'दिल बेचरा' चित्रपटातील अभिनेत्री संजना सांघीची देखील चौकशी होणार आहे. संजना चौकशीसाठी वांद्रे येथील पोलीस स्थानकात पोहोचली आहे.

fallbacks

याआधी यशराज फिल्म्सचे कास्टिंग दिग्दर्शकांची देखील चौकशी करण्यात आली आहे. सुशांत सिंह राजपूतने अगदी कमी कालावधीत आपल्या अभिनयाने चाहत्यांच्या मनात घर केलं. पण १४ जून रोजी वांद्रे येथील राहत्या घरात गळफास लावून त्याने त्याचा प्रवास संपवला.

fallbacks

सुशांतचा 'दिल बेचारा' हा अखेरचा चित्रपट  ठरणार आहे. २४ जुलै रोजी  ओटीटी प्लॅटफॉर्मवर 'दिल बेचारा'  प्रदर्शित होणार आहे. हॉटस्टारवर हा चित्रपट प्रदर्शित होणार असून सर्वांसाठी चित्रपट मोफत असणार आहे. चित्रपटात अभिनेता सुशांत सिंह राजपूतसोबत अभिनेत्री संजना सांघी मुख्य भूमिका साकारताना दिसणार आहे. 

'दिल बेचारा' चित्रपटाचे दिग्दर्शन मुकेश छाब्रा यांनी केले आहे. तसेच हा चित्रपट जॉन ग्रीक यांच्या ‘द फॉल्ट इन आवर स्टार्स’ या पुस्तकावर आधारित असल्याचे म्हटले जाते.

Read More