Marathi News> मनोरंजन
Advertisement

एम्सच्या रिपोर्टवर सुशांतच्या बहिणीची प्रतिक्रिया

काय म्हणाली सुशांतची बहिण...
 

एम्सच्या रिपोर्टवर सुशांतच्या बहिणीची प्रतिक्रिया

मुंबई : अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या आत्महत्येनंतर बॉलिवूडमधील अनेक रहस्य समोर येत आहे. सुशांत आत्महत्या प्रकरणी सीबीआई (CBI), ईडी (ED), एनसीबी (NCB) या तीन केंद्रीय यंत्रणा तपास करत आहे. दरम्यान,  एम्सच्या पथकाने अतिशय महत्वाची माहित दिली आहे. सुशांतसिंग राजपूतची हत्या झालेली नसून ती आत्महत्याच आहे. एम्सच्या फॉरेन्सिक विभागाचे प्रमुख डॉ. सुधीर गुप्ता यांनी ही माहिती दिली आहे. यावर सुशांतची बहिण श्वेता सिंहने प्रतिक्रिया दिली आहे. 

श्वेता सिंह ट्विट करत म्हणाली की, 'आम्ही जिंकू....' श्वेताने सुशांत आत्महत्या प्रकरणी अद्यापही माघार घेतली नसल्याचं स्पष्ट होत आहे. सुशांतला न्याय देण्याची तिची लढाई संपलेली नाही. एम्सने दिलेल्या रिपोर्टवर सुशांतच्या कुटुंबीयांनी आणि चाहत्यांनी नाराजी व्यक्त केली आहे. 

एम्सने जारी केलेल्या रिपोर्टनुसार, ज्या परिस्थितीत सुशांतच निधन झालं आहे. त्यामध्ये कोणताही फाऊल प्ले नाही. हे आत्महत्येचं प्रकरण आहे. AIIMS मेडिकल बोर्डाने सोमवारी सीबीआयकडे आपला रिपोर्ट दिला आहे. 

Read More