Marathi News> मनोरंजन
Advertisement

भावाच्या लग्नात प्रियकरासह सुष्मिताने धरला ठेका

सुष्मिता आणि तिचा बॉयफ्रेंड रोमन शॉलचा नृत्य आविष्कार आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरत आहे.

भावाच्या लग्नात प्रियकरासह सुष्मिताने धरला ठेका

मुंबई : सिनेस्टार सोशल मीडियाच्या माध्यमातून नेहमीच त्यांच्या आयुष्यातील घडामोडींची माहिती इतरांना देत असतात. सुष्मितासुद्धा सोशल मीडियावर अपडेट राहून दैनंदिन जीवनातील घडामोडी तिच्या चाहत्यांना कळवत असते. सध्या सोशल मीडियावर तिच्या भावाच्या लग्नाचे फोटो आणि व्हिडीओ चांगलेच व्हायरल होत आहेत. याचदरम्यान सुष्मिता आणि तिचा बॉयफ्रेंड रोमन शॉलचा नृत्य आविष्कार आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरत आहे. सुष्मिताने स्वत:च्या इन्स्टाग्राम अकाउंटवरून अनेक व्हिडीओ शेअर केले आहेत. 

सुष्मिता आणि रोमन हे दोघंही 'नचदे ने सारे' या गाण्यावर ताल धरताना दिसले. नृत्याच्या माध्यमातून त्या दोघांमधील केमिस्ट्री स्पष्ट पणे झळकत आहे. सुष्मिताशिवाय तिच्या दोन मुलींनी देखील मामाच्या लग्नात आपला नृत्याविष्कार सादर केला. त्याचबरोबर नवविवाहित दाम्पत्य असणाऱ्या चारू आणि राजीवचाही  नृत्य करतानाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. 

चारू आणि राजीवचा विवाह सोहळा राजस्थानी पद्धतीत संपन्न झाला. या विवाह सोहळ्याच्या चर्चा चांगल्याच रंगल्या आहेत. विवाह सोहळ्यानंतर या जोडप्याचा स्वागत सोहळ्याचे आयोजन मुंबईत करण्यात येणार असल्याच्या चर्चा होत आहेत. परंतु यावर अद्याप कोणात्याही प्रकारची अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही.

Read More