Marathi News> मनोरंजन
Advertisement

Bday : सुष्मिता सेन फिटनेससोबतच 'या' गोष्टींसाठी लोकप्रिय

44 वा वाढदिवस साजरा करतेय सुष्मिता सेन 

Bday : सुष्मिता सेन फिटनेससोबतच 'या' गोष्टींसाठी लोकप्रिय

मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री आणि मिस यूनिवर्स सुष्मिता सेन (Sushmita Sen) खूप दिवसांपासून सिल्वर स्कि्रिनपासून दूर आहे. मात्र असं असलं तरीही सुष्मिता कधी तिच्या रिलेशनशिपमुळे तर कधी फिटनेसमुळे चर्चेत राहते. आज सुष्मिता सेनचा 44 वा वाढदिवस (44th Birthday)असूनही ती नवीन अभिनेत्रीपेक्षा काही कमी नाही. आज तिच्या वाढदिवसानिमित्त जाणून घेऊया खास गोष्टी... 

बॉलिवूडमध्ये डेब्यू 

1994 मध्ये सुष्मिता सेन मिस युनिवर्स झाली. ज्यानंतर तिला बॉलिवूडमधून अनेक ऑफर्स आल्या. 1996 मधून सुष्मिताने फिल्मी करिअरला 'दस्तक' सिनेमातून सुरूवात केली. 1999 हे वर्ष सुष्मितासाठी खूप खास ठरलं. 'बीबी नंबर 1' आणि 'सिर्फ तुम' सारखे दोन सुपरहिट सिनेमे यावर्षी रिलीज झाले. 

फिल्म फेअरने सन्मान 

सलमान खानसोबत आलेल्या 'बीबी नंबर 1' सिनेमात सुष्मिता सेनला सर्वोत्कृष्ठ सहायक अभिनेत्रीचा फिल्म फेअर पुरस्काराने सन्मानित केलं आहे. त्याचप्रमाणे 'सिर्फ तुम' सिनेमाला देखील नॉमिनेट केलं आहे. 

मुलींना घेतलं दत्तक 

सुष्मिता सेनने दोन मुलींना दत्तक घेतलं आहे. रेने या मुलीला तिने 2000 साली दत्तक घेतलं. आता ती 19 वर्षांची आहे. तर आलीशाला 2009 मध्ये दत्तक घेतलं. दोघींसोबत सुष्मिता अनेक व्हिडिओ शेअर करत असते. 

पर्सनल लाइफ 

सुष्मिता सेनचा जन्म हैद्राबादमध्ये 19 नोव्हेंबर 1975 साली झाला. सुष्मिताचे वडिल विंग कमांडर असून आई ज्वेलरीचा व्यवसाय करत असे. सुष्मिताने सेनेचा अभ्यास करून मॉडेलिंगच्या जगात आली आणि स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली. 

Read More