Marathi News> मनोरंजन
Advertisement

ब्रेकअपनंतर सुष्मिताच्या आयुष्यातून 'हे' दु:ख संपणार कधी?

बॉयफ्रेंडनंतर सुष्मिता सेनच्या आयुष्यातून जाणार आणखी एक व्यक्ती, नक्की काय आहे प्रकरण?  

ब्रेकअपनंतर सुष्मिताच्या आयुष्यातून 'हे' दु:ख संपणार कधी?

मुंबई : अभिनेत्री सुष्मिता सेन कायम तिच्या खासगी कारणांमुळे चर्चेत असते. कधी बॉयफ्रेंडसोबत ब्रेकअप तर कधी भाऊ राजीव सेनच्या वैवाहिक आयुष्यात सुरू असलेले कलह. सध्या राजीव सेन आणि चारु असोपा यांच्या नात्यात काही तरी बिनसलं असल्याचं समोर येत आहे. सध्या विभक्त राहात असलेल्या राजीव आणि चारुने एक मोठा निर्णय घेतला आहे. ज्यामुळे त्यांच्या चाहत्यांना मोठा धक्का बसला आहे. 
 
दरम्यान चारु आणि राजीवने इन्स्टाग्रामवर एकमेकांना अनफॉलो केलं आहे. ज्यामुळे चारू आणि राजीवमध्ये काही तरी बिनसलं असल्याचं कळत आहे. अशात सोशल मीडियावरील त्यांच्या निर्णयाने त्यांच्यातील वाद जगासमोर आला आहे. 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

चारु आणि राजीव यांना 4 महिन्यांची एक मुलगी आहे. त्यांच्या मुलीचं नाव झियाना असं आहे. चारु सोशल मीडियावर लेकीसोबत सतत फोटो शेअर करत असते. झियानाच्या जन्मानंतर काही महिन्यात चारु राजीवला सोडून माहेरी बिकानेरला निघून गेली. 

त्यानंतर चारु मुंबईत अद्याप परतली नाही. चारू असोपाने 7 जून 2019 रोजी सुष्मिता सेनचा भाऊ राजीव सेनसोबत लग्न केले. या दोघांना झियाना नावाची मुलगी आहे. चारू तिच्या मुली आणि पतीसोबत सोशल मीडियावर फोटो शेअर करत असते. 

यासोबतच चारू फेसबुकवर तिचा ब्लॉगही चालवते आणि छोट्या छोट्या गोष्टीही चाहत्यांसोबत शेअर करते. आता चारु आणि राजीवच्या आयुष्यात कोणत्या घटना घडणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. 

Read More