Marathi News> मनोरंजन
Advertisement

Sushmita Senची मुलगी Renee Senचा बॉयफ्रेन्डबद्दल मोठा खुलासा

अभिनेत्री सुष्मिता सेन कायम तिच्या खासगी आयुष्यामुळे चर्चेत असते. 

Sushmita Senची मुलगी Renee Senचा बॉयफ्रेन्डबद्दल मोठा खुलासा

मुंबई : अभिनेत्री सुष्मिता सेन कायम तिच्या खासगी आयुष्यामुळे चर्चेत असते. कधी तिच्या बॉयफ्रेन्डमुळे तर कधी तिच्या दोन मुलींमुळे. सुष्मिताची एक मुलगी रेने हिने अभिनय क्षेत्रात पाय ठेवला आहे. त्यामुळे तिच्या चाहत्यांच्या संख्येत देखील मोठी वाढ झाली आहे. सोशल मीडियावर देखील तिच्या चाहत्यांची संख्या फार मोठी आहे. रेनेने नुकताचं सोशल मीडियावर एक सेशन ठेवलं होतं. या सोशनमध्ये तिला तिच्या बॉयफ्रेन्डबद्दल प्रश्न विचारण्यात आला. तेव्हा रेनेने दिलेलं उत्तर तिच्या आईला गर्व वाटावं असं होतं. 

नुकताचं रेनेने इन्स्टाग्राम  'आस्क मी एनीथिंग' (Ask Me Anything) सेशनच्या माध्यामातून चाहत्यांची संपर्क साधला. त्यानंतर रेनेला अनेक प्रश्न तिच्या चाहत्यांनी विचारले. त्यांच्या प्रश्नांचं उत्तर रेनेने अगदी अचूक दिलं आहे. एका चाहत्याने तिला बॉयफ्रेन्ड आहे का? असा प्रश्न विचारला. त्यावर रेने म्हणाली 'फोकस काम आहे.'

fallbacks

तर दुसऱ्या चाहत्याने विचारलं 'एक्स  बॉयफ्रेन्डबद्दल सांग?' या प्रश्नावर रेने म्हणाली, 'याबद्दल बोलणं व्यर्थ आहे.' तर एकाने तिला भविष्यातील बॉयफ्रेन्डबद्दल विचारलं, तेव्हा रेने म्हणाली 'जर मी या प्रश्नाचा उत्तर देवू शकली असती.' रेनेचा हा सोशल मीडियावर हा सेशन मस्त रंगला होता. 

रेनेच्या अभिनयाबद्दल सांगायचं झालं तर, तिने शॉर्ट फिल्मच्या माध्यमातून अभिनय क्षेत्रात पाय ठेवला. 'सुट्टाबाजी' या शॉर्टफिल्मच्या माध्यमातून ती प्रेक्षकांच्या भेटीस आली. रेनेची  'सुट्टाबाजी' शॉर्टफिल्म हॉटस्टारवर प्रदर्शित करण्यात आली होती. 

Read More