Marathi News> मनोरंजन
Advertisement

ललित मोदींच्या प्रेमात आकंठ बुडाली Sushmita Sen, पावसात भिजतानाचा 'तो' फोटो आणि...

ललित मोदींच्या प्रेमात आकंठ बुडालेल्या सुष्मिताचा पावसात भिजताना फोटो पाहून तुम्हीही म्हणाल...   

ललित मोदींच्या प्रेमात आकंठ बुडाली Sushmita Sen, पावसात भिजतानाचा 'तो' फोटो आणि...

मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री सुष्मिता सेन सध्या चर्चेत आहे. सगळीकडे सध्या तिचीच चर्चा आहे. कारण ही त्याला तसंच आहे. सुष्मिता सेन गेल्या काही दिवसांपासून ललित मोदीसोबतच्या अफेअरमुळे चर्चेत आहे. एकीकडे बॉलिवूड सेलिब्रिटी तिचे अभिनंदन करत आहेत, तर दुसरीकडे सोशल मीडियावर यूजर्स तिला ट्रोल करत आहेत. 

यूजर्स या नात्यावर आक्षेपार्ह कमेंट करत आहेत. ललित मोदीला डेट करण्यासाठी अनेक लोक सुष्मिताला 'गोल्ड डिगर' म्हणत आहेत. या सगळ्या दरम्यान सुष्मिताचा एक फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

फोटोमध्ये सुष्मिता कारमध्या बसून पावसाच्या आनंद लुटताना दिसत आहे. फोटो पोस्ट करत तिने कॅप्शनमध्ये 'This girl loves the rains!!! This girl loves Aamchi Mumbai!!' असं लिहिलं आहे. 

अभिनेत्रीच्या फोटोंवर चाहत्यांच्या कमेंट आणि लाईक्सचा वर्षाव होत आहे. काही दिवसांपूर्वी ललित मोदी यांनी सुष्मिता सेन सोबतचे काही फोटो शेअर केले होते. त्यानंतर सोशल मीडियावर एकच खळबळ उडाली होती. सुष्मिताने देखील ट्रोल करणाऱ्यांना उत्तर दिले आहे.

ललित मोदी आधी देखील सुष्मिता अनेक सेलिब्रिटींसोबत रिलेशनमध्ये होती. पण अभिनेत्रीने अद्याप लग्न केलं नाही. एवढंच नाही तर, सुष्मिताने दोन मुलींना दत्तक घेतलं आहे. सुष्मिताची मोठी मुलगी लवकरच बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार असल्याचं सांगण्यात येत आहे. 

 

 

 

 

 

Read More