Marathi News> मनोरंजन
Advertisement

Sushmita Sen फक्त दोन मुलींचीच नाही तर, एका मुलाची देखील आई? फोटो पोस्ट करत म्हणाली...

दोन मुलींना दत्तक घेऊनही फोटोमध्ये दिसणाऱ्या मुलाला सुष्मिता म्हणतेय...  

Sushmita Sen फक्त दोन मुलींचीच नाही तर, एका मुलाची देखील आई? फोटो पोस्ट करत म्हणाली...

मुंबई : अभिनेत्री सुष्मिता सेन (Sushmita Sen) गेल्या काही दिवसांपासून उद्योगपती ललित मोदीसोबत असलेल्या नात्यामुळे चर्चेत आहे. ललित मोदीने सोशल मीडियाच्या माध्यमातून सुष्मिताला डेट करत असल्याचं स्पष्ट केलं. एवढंच नाही तर सुष्मितानेही ललित मोदीसोबत असलेल्या नात्याला मान्यता दिली. अद्यापही चाहत्यांमध्ये सुष्मिताच्या खासगी आयुष्याबद्दल चर्चा रंगलेल्या असतात. एकीकडे ललित मोदी तर दुसरीकडे इन्स्टाग्रामवर पोस्ट केलेल्या फोटोमध्ये दिसणाऱ्या मुलामुळे सुष्मिता पुन्हा चर्चेत आली आहे.  

सुष्मिता अनेकदा तिच्या दत्तक मुली रेनी आणि अलिशासोबत दिसते, पण आता सुष्मिताने एक Family Photo शेअर केला आहे. ज्यामध्ये सुष्मिताच्या मांडीवर एक गोंडस मुलागा बसलेला दिसत आहे.

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

फोटोमध्ये मुलाला पाहून तो कोण आहे? असा प्रश्न चाहते विचारत आहेत. खुद्द सुष्मिताने फोटो पोस्ट करत कमेंटमध्ये चिमुकल्याला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहे.

Family Photo सोशल मीडियावर पोस्ट करत अभिनेत्री म्हणते, 'It’s a woman’s world and I am the man in it... माझ्या या हॅडसम. दयाळु आणि खोडकर गॉडसनला वाढदिवसाच्या शुभेच्छा...' सध्या अभिनेत्री पोस्ट सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. 

फोटोमध्ये दिसणार मुलगा सुष्मिताच्या मैत्रिणीचा मुलगा आहे. पण अभिनेत्री चिमुकल्याला स्वतःचा मुलगा मानते. तिच्या फोटोवर अनेकांनी कमेंट आणि लाईक्सचा वर्षाव करत आहेत. 

Read More