Marathi News> मनोरंजन
Advertisement

हार्ट अटॅकमधून सावरताच Sushmita Sen च्या हाती तलवार! सोशल मीडियावर वारंवार पाहिला जातोय Video

Sushmita Sen Aarya Season 3 : बॉलिवूड अभिनेत्री सुश्मिता सेन तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळे नेहमीच चर्चेत असते. काही दिवसांपूर्वीच तिला हृदयविकाराचा झटका आला होता. त्यामधून सुश्मिताने स्वत:ला सावरत तिच्या रुटीनची सुरुवात केली. 

हार्ट अटॅकमधून सावरताच Sushmita Sen च्या हाती तलवार! सोशल मीडियावर वारंवार पाहिला जातोय Video

Sushmita Sen Aarya 3 Teaser Video: अलिकडेच अभिनेत्री सुश्मिता सेनला (Sushmita Sen) हृदयविकाराचा झटका आला होता. वयाच्या 47 व्या वर्षी अभिनेत्रीला हृदयविकाराचा झटका आल्याने अनेकांना धक्का बसला होता. प्रत्येकजण तिच्याबद्दल चिंता व्यक्त करत होते. दरम्यान सुश्मिता आता आजारातून बरी झाली असून तीने दैनंदिन कामकाजाला सुरुवात देखील केली. याचदरम्यान सुश्मिताचा आर्या 3 (Aarya Season 3) मधील तिच्या लूकचा पहिला व्हिडिओ शेअर केला आहे. आर्या 3 च्या व्हिडीओमध्ये सुश्मिचा किलर लूक प्रचंड व्हायरल होत आहे. 

सुश्मिता सेनची पहिली 'आर्या' ही वेब सीरिज चांगलीच गाजली होती. या वेब सीरिजमधून सुश्मिताने कमबॅक केले होते. या वेबसिरीजचे आतापर्यंत 2 सीझन प्रदर्शित झाले असून ज्यात सुश्मिताचा दमदार परफॉर्मन्स पाहायला मिळाला. त्यानंतर पुन्हा एकदा सुश्मिता तिसऱ्या सिझनमधून प्रेक्षकांचे मनोरंजन करण्यासाठी सज्ज झाली आहे. नुकताच या वेब सिरीजच्या तिसऱ्या सीझनचा टीझर रिलीज करण्यात आला आहे. आर्या सीझन 3 च्या घोषणेनंतर चाहते खूप आनंदी दिसत आहेत. इतकंच नाही तर सुश्मिता सेनचा हा डॅशिंग लूक खूपच कूल वाटत आहे. 

आर्या सीझन 3 लवकरच रिलीज

गेल्या 2 वर्षात सुश्मिता सेनची प्रसिद्ध वेब सीरिज आर्या खूप लोकप्रिय झाली आहे. 2020 पासून सुरू झालेली आर्या वेब सिरीजची मालिका सुरू आहे. या वेब सिरीज लोकांनी चांगली पसंती दिली. या मालिकेचे दिग्दर्शक राम माधवानी यांनी केले असून आता आर्याच्या सीझन 3 ची जबाबदारी घेतली आहे. ज्याच्या आधारावर सुष्मिता सेनचा आर्या 3 लवकरच प्रदर्शित होणार आहे. ओटीटी प्लॅटफॉर्म डिस्ने प्लस हॉटस्टारवर आर्य 3 ची घोषणा करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. 'आर्या' या वेब सिरीजचे दोन्ही सीझन प्रेक्षकांना आवडले आहेत. पहिल्या सत्राला उत्कृष्ट नाटक मालिकेसाठी आंतरराष्ट्रीय एमी पुरस्कार नामांकन मिळाले. या वेब सिरीजचे दिग्दर्शन राम माधवानी यांनी केले आहे. या मालिकेत नमित दास, मनीष चौधरी आणि विनोद रावत यांच्याही महत्त्वाच्या भूमिका आहेत. सुष्मिता सेनने शेअर केलेल्या व्हिडिओवर चाहत्यांच्या कमेंट्सचा पाऊस पडला आहे. एक चाहत्यने लिहिलं आहे, "आर्या 3 साठी आम्ही खूप उत्सुक आहोत.  दुसऱ्या एका चाहत्याने म्हटलं की, "आता नव्या सीझनची प्रतीक्षा आहे".

Read More