Marathi News> मनोरंजन
Advertisement

फोटोस : सुष्मिता सेनने शेअर केला कंबरेवरचा टॅटू

बॉलीवूड अभिनेत्री सुष्मिता सेन मोठ्या पडद्यापासून दूर असली तरीही नेहमी चर्चेत असते. ती सोशल मीडियावर नेहमी अॅक्टीव्ह असते. आपल्या पर्सनल लाईफबद्दल ती फॅन्सना नेहमी अपडेट करत असते.

फोटोस : सुष्मिता सेनने शेअर केला कंबरेवरचा टॅटू

नवी दिल्ली : बॉलीवूड अभिनेत्री सुष्मिता सेन मोठ्या पडद्यापासून दूर असली तरीही नेहमी चर्चेत असते. ती सोशल मीडियावर नेहमी अॅक्टीव्ह असते. आपल्या पर्सनल लाईफबद्दल ती फॅन्सना नेहमी अपडेट करत असते.

नुकताच सुष्मिताने आपला टॅटू फोटो शेयर केलाय. सुष्मिताच्या या टॅटूची तिच्या फॅन्सनी खूप तारीफ केली आहे.

टॅटूसोबत फिटनेस 

 

#poetic #udaipur ready to hit the gym? Noooooooo!!!!!#justbeing 

A post shared by Sushmita Sen (@sushmitasen47) on

 या टॅटूमध्ये केवळ टॅटूच दिसतोय अस नाही तर ती यामध्ये खूप फिट असल्याचेही दिसतेय. ती प्रत्येक वेळेस व्यायामाचे व्हिडिओ शेयर करत असते. 

बॉलीवुड एन्ट्री 

सुष्मिताने १९९४ साली मिस  युनिव्हर्सचा किताब जिंकला. त्यानंतर आपल्या बॉलीवूड प्रवासाला सुरूवात केली.

२०१० मध्ये आलेल्या  'नो प्रोब्लेम' सिनेमात ती दिसली होती. आपण पुन्हा बॉलीवुडमध्ये एन्ट्री करणार असल्याचे तिने काही दिवसांपूर्वी म्हटले होते. 
 

Read More