Marathi News> मनोरंजन
Advertisement

सुष्मिताच्या घरचं आणखीन एक 'लव्हबर्ड', या अभिनेत्रीला डेट करतोय सुष्मिताचा भाऊ

सुष्मिताच्या भावाच्या अर्थात राजीवच्या आयुष्यातही एक नवा आनंद आलाय

सुष्मिताच्या घरचं आणखीन एक 'लव्हबर्ड', या अभिनेत्रीला डेट करतोय सुष्मिताचा भाऊ

मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री सुष्मिता सेन सध्या खाजगी कारणांमुळे खूपच चर्चेत आहे. आत्तापर्यंत सुष्मिताचं मॉडेल रोमन शॉल याच्यासोबत असलेल्या रोमान्टिक नात्यामुळे हे 'लव्हबर्ड' चर्चेत होतं... आता मात्र सुष्मिताच्या घरात आणखीन एक लव्हबर्ड असल्याचं समजतंय. हे लव्हबर्ड म्हणजे सुष्मिताचा भाऊ राजीव सेन आणि त्याची गर्लफ्रेंड... 

सुष्मिताच्या भावाच्या अर्थात राजीवच्या आयुष्यातही एक नवा आनंद आलाय. राजीव टीव्ही अभिनेत्री चारू असोपा हिला डेट करतोय. राजीवनं चारूला टॅग करत इन्स्टाग्रामवर दोघांचा एक क्यूट फोटो शेअर केलाय. चारू हा छोट्या पडद्यावरचा ओळखीचा चेहरा आहे. ती सध्या एका टीव्ही कार्यक्रमात कर्णाच्या पहिल्या पत्नीच्या भूमिकेत दिसतेय. 

 

fallbacks

 

'लव्हबर्डस' असं राजीवनं आपल्या आणि चारूच्या फोटोला कॅप्शन दिलंय. राजीव आणि चारू एकमेकांना दीर्घकाळापासून डेट करत आहेत. परंतु, दोघांनी सोशल मीडियावर पहिल्यांदाच खुलेपणानं आपल्या नात्याची कबुली दिलीय. 

मिळालेल्या माहितीनुसार, चारू असोपा आणि राजीव सेन यांची भेट एका पार्टीदरम्यान झाली होती. यानंतर दोघांचं नातं हळूवारपणे पुढे सरकलं. ११ जानेवारी रोजी दोघंही एका रोमान्टिक डेटवर असताना एक फोटो शेअर करत राजीवनं म्हटलंय 'फायनली वी मेट'

 

fallbacks

 

राजीव सेनपूर्वी चारू असोपा हिचा साखरपुडा नीरज मालविया याच्यासोबत झाला होता. परंतु, त्यांचं नातं काही टीकलं नाही आणि दोघांनी साखरपुडा तोडण्याचा निर्णय घेतला. 

Read More