Marathi News> मनोरंजन
Advertisement

सुयश टिळकचे प्लास्टिक न वापरण्याचे आवाहन

प्रसिद्ध मराठी टीव्ही अभिनेता सुयश टिळक सोशल मीडियावर फार कमी प्रमाणात अॅक्टिव्ह असतो. सध्या सगळीकडेच निसर्ग वाचवण्यासाठी सोशल मीडियावर मोहीम सुरु करण्यात आल्यात. 

सुयश टिळकचे प्लास्टिक न वापरण्याचे आवाहन

मुंबई : प्रसिद्ध मराठी टीव्ही अभिनेता सुयश टिळक सोशल मीडियावर फार कमी प्रमाणात अॅक्टिव्ह असतो. सध्या सगळीकडेच निसर्ग वाचवण्यासाठी सोशल मीडियावर मोहीम सुरु करण्यात आल्यात. सुयश टिळकनेही प्लास्टिक बंदीला समर्थन देताना लोकांना प्लास्टिक न वापरण्याचे आवाहन केलेय. सुयशने नुकताच एक व्हिडीओ इन्स्टाग्रामवर पोस्ट केलाय. यात त्याने कॅप्शन #beatplasticpollution असं दिलंय. प्लास्टिकपासून होणाऱ्या प्रदूषणापासून आपल्याला काय करता येईल हे सुयशने व्हिडीओत सांगितले आहे. प्लास्टिकचे मग वापरण्याऐवजी सिरॅमिकचा मग वापरा हेही त्याने व्हिडीओतून सांगितलेय. 

 

#beatplasticpollution @unenvironment

A post shared by Suyash Tilak (@suyashtlk) on

तसेच रोजच्या जगण्यात प्लास्टिकच्या वस्तूंचा वापर करु नका असेही त्याने आपल्या चाहत्यांना आवाहन केलंय. तसेच हे चॅलेंज त्याने पुढे आपला मित्र सिद्धार्थ चांदेकरला दिलेय.

सुयश झी मराठीवरील का रे दुरावा या मालिकेतून घरांघरांत पोहोचला होता. या मालिकेत त्यामो जयची भूमिका साकारली होती. सध्या तो झी युवावरील बापमाणूस या मालिकेत काम करतोय.

Read More