Marathi News> मनोरंजन
Advertisement

सुयश टिळक -आयुषी भावेचं केळवण; पाहा फोटो

काही दिवसांपूर्वी त्यांचा साखरपुडा झाला आहे.

सुयश टिळक -आयुषी भावेचं केळवण; पाहा फोटो

 मुंबई : अभिनेता सुयश टिळक लवकरचं त्याच्या नव्या आयुष्याची सुरूवात अभिनेत्री आयुषी भावेसोबत करणार आहे. काही दिवसांपूर्वी त्यांचा साखरपुडा झाला. खुद्द सुयशने सोशल मीडियाच्या माध्यमातून साखरपुडा झाल्याची घोषणा केली. आता त्याच्या केळवणाचे फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहेत. अभिनेत्री आयुषी भावेने तिच्या केळवणाचे फोटो इन्स्टाग्रामवर पोस्ट केले आहेत. फोटो पोस्ट करत तिने कॅप्शनमध्ये, 'नवीन सुरूवात....' असं लिहिलं आहे. सुयश-आयुषीचे फोटो पाहुन त्यांच्यावर चाहत्यांकडून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. 

साखरपुड्याचे फोटो पोस्ट करत सुयश म्हणाला...

fallbacks


'माझ्या आयुष्यातली प्रत्येक गोष्ट सुंदर बनवणारी स्त्री. हॅप्पी बर्थ डे लव....आणि त्याने ही पोस्ट आयुषी भावेला टॅग केली आहे. तुझ्याबरोबर माझं आयुष्य पूर्ण झालं आहे आणि मी खूप भाग्यवान कारण माझ्याकडे तुझ्यासारखी सुंदर जीवनसाथी मिळाली.. सांगण्यास आनंद होतोय, आम्ही ऑफिशिअली एंगेज झालोय. आपल्या सर्व प्रियजनांच्या आशीर्वादाने व प्रेमाने आम्ही एकत्र नवीन प्रवास सुरू करतोय.'

सुयश टिळकची जोडीदार नेमकी कोण आहे? 
आयुषी भावे ही अभिनेत्री आणि लोकप्रिय डान्सर आहे.  युवा डान्सिंग क्विन या टीव्ही शोमध्ये आयुषी भावे दिसली. आयुषी भावे लवकरच एका आगामी सिनेमात दिसणार आहे. 

सुयश सध्या काय करतोय?
सुयश टिळक सध्या झी मराठीवरील 'शुभमंगल ऑनलाईन' या मालिकेत शंतनुची भूमिका साकारत आहे. रिल लाईफमध्ये सुद्धा नुकतंच सुयशचं लग्न झालं आहे. तर आता रिअल लाईफमध्ये तो लवकरच लग्नबंधनात अडकणार आहे. 

 

Read More