Marathi News> मनोरंजन
Advertisement

मुंबई पुणे मुंबई 4 येणार? स्वप्नील जोशीच्या 'त्या' पोस्टमुळे एकच चर्चा

Swapnil Joshi Mumbai Pune Mumbai 4 : स्वप्नील जोशीनं चाहत्यांशी संपर्क साधत असताना दिली हिंट

मुंबई पुणे मुंबई 4 येणार?  स्वप्नील जोशीच्या 'त्या' पोस्टमुळे एकच चर्चा

Swapnil Joshi Mumbai Pune Mumbai 4 : निर्माता अभिनेता स्वप्नील जोशीचे लाखो चाहते आहेत. मराठीतला चॉकलेट बॉय अशी ओळख असणारा स्वप्नील जोशी हा नेहमीच सोशल मीडियावर सक्रिय असल्याचे पाहायला मिळते. सोशल मीडियावर तो त्याच्या चाहत्यांशी संपर्क साधताना दिसतो. नुकत्याच त्यानं सोशल मीडियावर त्याच्या चाहत्यांशी संपर्क साधला त्यावेळी न कळत त्यानं 'मुंबई पुणे मुंबई 4' विषयी एक हिंट दिली आहे. त्यामुळे सगळ्यांना आशा आहे की लवकरच त्या दोघांना एकत्र पाहायला मिळणार आहे. 

 स्वप्नीलनं त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटच्या स्टोरीवरून ( Ask Me Anything )  या सगमेन्टसोबत चाहत्यांशी संपर्क साधला. त्यावेळी त्याच्या चाहत्यांनी त्याला अनेक प्रश्न विचारले. यावेळी अनेकांनी स्वप्नीलला 'मुंबई पुणे मुंबई 4' कधी येणार या विषयी प्रश्न विचारला. त्यानंतर स्वप्नीलनं त्याच्या हटके अंदाजात उत्तर दिलं आहे. त्यावर उत्तर देत स्वप्नील जोशी म्हणाला, जे कोणी 'मुंबई पुणे मुंबई 4' विषयी विचारत आहेत. त्यांच्यासाठी कधीच नाही असा विचार करू नका. त्याशिवाय त्यानं या चित्रपटाचे दिग्दर्शक म्हणजे सतीश राजवाडे आणि अभिनेत्री मुक्ता बर्वे या दोघांना टॅग केलं आहे. आता यातून स्वप्नील नेमकं काय म्हणतोय हे गुलदस्त्याच आहे !

fallbacks

त्यामुळे आता स्वप्नील जोशीनं त्याच्या या इन्स्टाग्राम स्टोरीमधून असं उत्तर दिल्यानंतर सगळ्या चाहत्यांना पडलेला प्रश्न म्हणजे 'मुंबई पुणे मुंबई 4' नक्की येणार का? स्वप्नील आणि मुक्ताची सुपरहिट जोडी पुन्हा प्रेक्षकांना बघायला मिळणार का? अश्या अनेक प्रश्नांना उधाण आलं आहे. 'मुंबई पुणे मुंबई' या चित्रपटानं प्रेक्षकांच्या मनात वेगळं घर निर्माण केलं आहे आणि यात कोणतीही शंका नाही.

हेही वाचा : Shilpa Shetty ED Raid : शिल्पा शेट्टीच्या घरी ईडीची धाड; जाणून घ्या सविस्तर प्रकरण

सध्या स्वप्नील त्याचा नव्या चित्रपटाची तयार करत आहे. येणाऱ्या वर्षात अनेक वेगवेगळ्या धाटणीच्या भूमिकेत स्वप्नील जोशी दिसणार आहे. 2024 हे वर्ष त्याने वेगवेगळ्या भूमिका साकारत गाजवलंय कधी तो अभिनेत्याच्या भूमिकेत दिसला तर कधी निर्मात्याच्या. पण कोणतीही भूमिका असो स्वप्नील जोशीनं ही चोख साकारली आहे. त्यानं प्रत्येकवेळी प्रेक्षकांचे मनोरंजन केलं आहे. 

Read More