Marathi News> मनोरंजन
Advertisement

Good News : अभिनेत्री स्वरा भास्करला कन्यारत्न प्राप्त

अभिनेत्री स्वरा भास्कर नुकतीच आई झाली आहे. अभिनेत्रीने नुकताच एका मुलीला जन्म दिला आहे. स्वरा 23 सप्टेंबरला आई झाली असली तरी आज त्याची तिने घोषणा केली आहे. स्वरा आणि तिचा पती फहाद अहमद यांनी त्यांच्या मुलीचे नाव राबिया ठेवलं आहे. 

Good News : अभिनेत्री स्वरा भास्करला कन्यारत्न प्राप्त

मुंबई : अभिनेत्री स्वरा भास्कर नुकतीच आई झाली आहे. अभिनेत्रीने नुकताच एका मुलीला जन्म दिला आहे. स्वरा 23 सप्टेंबरला आई झाली असली तरी आज त्याची तिने घोषणा केली आहे. स्वरा आणि तिचा पती फहाद अहमद यांनी त्यांच्या मुलीचे नाव राबिया ठेवलं आहे. सुफी संत राबिया बसरी यांच्या नावावरून या मुलीचे नाव ठेवण्यात आलं आहे.

स्वरा भास्करने 6 जून रोजी सोशल मीडियावर तिच्या गरोदरपणाची घोषणा केली होती. पती फहादसोबतचा फोटो शेअर करता तिने एक अतिशय भावूक पोस्टही शेअर केली आहे. फोटो शेअर करताना स्वराने लिहिले होतं,  'कधीकधी तुमच्या सर्व इच्छा एकाच वेळी पूर्ण होतात. या नवीन प्रवासात पाऊल ठेवण्यासाठी मी खूप उत्साही, कृतज्ञ आणि त्याचबरोबर खूप अनभिज्ञ आहे.

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

फहाद-स्वरा यांचा विवाह यावर्षी ६ जानेवारीला झाला.
फहाद अहमद आणि स्वरा भास्करची लव्हस्टोरी खूपच फिल्मी होती. विशेष विवाह कायदा, 1954 अंतर्गत 6 जानेवारी 2023 रोजी त्यांचं लग्न झालं. मात्र, लग्नानंतर तब्बल महिनाभरानंतर अभिनेत्रीने ही बातमी अधिकृत केली. स्वराचा पती फहाद अहमद हा समाजवादी पक्षाचा युवा नेता आहे.

Read More