Swara Bhaskar and Husband Fahad Ahmad Holi : बॉलिवूड अभिनेत्री स्वरा भास्कर ही सतत नेटकऱ्यांच्या निशाण्यावर असते. कोणत्या ना कोणत्या कारणामुळे ती सगळ्याचे लक्ष वेधते. अनेकदा तर तिच्या वादग्रस्त वक्तव्यामुळे ती चर्चेत येते. आता स्वरानं रंगपंचमी खेळल्याचे काही फोटो शेअर केले आहेत. त्यानंतर तिला आणि तिच्या नवऱ्याला ट्रोल करण्यात आलं. हे पाहता स्वरानं ट्रोलर्सला सडेतोड उत्तर देत नवरा फहाद अहमदनं या वर्षी रंगपंचमी अर्थात होळी का खेळली नाही याचं कारण सांगितलं आहे. काही नेटकऱ्यांनी फहाद होळीच्या कार्यक्रमात न येण्यावरून कमेंट करत धर्म आणि फेस्टिव्हलविषयी अनावश्यक कमेंट केल्या आहेत.
स्वरा भास्करननं नुकतेच तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून एक पोस्ट शेअर केली. या पोस्टमध्ये होळीचा सण तिनं किती आनंदानं साजरी केला याविषयी सांगितलं आहे. फोटोत तिच्यासोबत तिचा नवरा फहाद अहमद आणि तिची लेक राबिया दिसत आहेत. जिथे स्वरा आणि राबिया होळीच्या रंगांमध्ये रंगली होती. तर फहादच्या अंगावर रंग नाहीत कारण त्यानं रमजानचा रोजा ठेवला आहे.
स्वरानं शेअर केलेले फोटो पाहता त्यावर नेटकऱ्यांनी ट्रोल करण्यास सुरुवात केली. काही लोकांनी प्रश्न केला की फहाद होळीच्या रंगांमध्ये दिसत नाही आहे. एकानं विचारलं की तुझ्या नवऱ्याच्या अंगावर रंग का दिसत नाही आहे? दुसरा नेटकरी म्हणाला, आंधळ्या भक्ताचा प्रश्न, तुझ्या नवऱ्यानं होळी का खेळली नाही? या सारख्या अनेक कमेंट या येत होत्या. हे पाहता यावेळी देखील स्वरा आधीप्रमाणे शांत राहिली नाही. तिनं लगेच स्वराला सडेतोड उत्तर दिलं आहे. स्वरानं तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटच्या स्टोरीवरून हे फोटो शेअर करत लिहिलं की होळीच्या शुभेच्छा. एक छोटीशी गोष्ट आठवण करून द्यायची होती. लोकांना आपला सण साजरी करण्यासाठी भाग पाडल्याशिवाय आपला सण साजरा करणं आणि आनंद पसरवणे शक्य आहे.
स्वरा आणि फहादनं फेब्रुवारी 2023 मध्ये स्पेशल मॅरेज एक्ट अंतर्गत लग्न केलं आणि त्याचवर्षी त्यांना एक मुलगी देखील झाली. पण एक हाय-प्रोफाइल अंतरधार्मिक कपल असल्यानं ते नेहमीच ऑनलाइन ट्रोलर्सच्या निशाण्यावर राहिले. समाजवादी पार्टीचे नेता फहाद आणि स्पष्ट वक्तव्यासाठी ओळखली जाणारी स्वराला सतत ट्रोलिंगचा सामना करावा लागतो. सतत ट्रोलिंग होत असली तरी देखील दोघांनी त्यांच्या लग्नाचा आनंद सगळ्यांसोबत साजरा केला आहे. त्या दोघांनी जेव्हा लग्न केलं तेव्हा लग्नात हळद, मेहंदी पासून कव्वाली नाइट देखील होती.
हेही वाचा : 'सलमान मला रक्तबंबाळ अवस्थेत सोडून गेला...', अभिनेत्याने सांगितला सलमानबाबतचा धक्कादायक अनुभव, 'बालिशपणे...'
स्वरा नंतर बॉलिवूड अभिनेत्री सोनाक्षी सिन्हाानं 2024 मध्ये झहीर इकबालशी लग्न केलं. त्यावेळी देखील स्वरान सोनाक्षीला पाठिंबा देत समोर आली होती. आता स्वरासोबत सोनाक्षीला देखील ट्रोल करण्यात आलं. झहीरनं देखील होळी खेळली नाही यावरून त्याला ट्रोल करण्यात आलं होतं. तर सोनाक्षी त्याला पाठिंबा देत समोर आली आणि तिनं तो मुंबईत असून मी बाहेर शूटिंग करत असल्याचं सांगितलं.