Marathi News> मनोरंजन
Advertisement

'अभिनंदन'वर ट्विट; पाकिस्तानी अभिनेत्रीला स्वरा भास्करने फटकारलं

पाकिस्तानी अभिनेत्री वीना मलिकची अभिनंदन यांच्या सुटकेच्या घोषणेबाबत संतापजनक पोस्ट

'अभिनंदन'वर ट्विट; पाकिस्तानी अभिनेत्रीला स्वरा भास्करने फटकारलं

नवी दिल्ली : पुलवामा हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तान या दोन्ही देशात तणावपूर्ण वातावरण आहे. पाकिस्तानमधील दहशतवादी संघटना जैश-ए-मोहम्मदने पुलवामात केलेल्या हल्ल्यानंतर भारताने ठोस पावलं उचलली आहेत. या हल्ल्यानंतर दोन्ही देशातील नागरिकांमध्येही सोशल मीडियावर वाद निर्माण झाला आहे. भारतात पाकिस्तानी कलाकारांना बंदी घालण्यात आली आहे. दोन्ही देशांतील कलाकारांमधील संबंधातही तणाव निर्माण झाला आहे. पाकिस्तानी अभिनेत्री वीना मलिकने पाकिस्तानच्या ताब्यात असलेल्या भारताचे विंग कमांडर अभिनंदन यांच्याविषयी संतापजनक ट्विट केले. या ट्विटवर अभिनेत्री स्वरा भास्करने वीना मलिकला चांगलेच खडेबोल सुनावले आहेत. 

विंग कमांडर अभिनंदन यांचा जखमी अवस्थेतील एक फोटो वीना मलिकने सोशल मीडियावर शेअर केला आहे. या फोटोत अभिनंदन यांच्या डोळ्यांवर पट्टी बांधून त्यांना काही लोकांनी पकडलं असल्याचा फोटो आहे. हा फोटो शेअर करत वीना मलिकने संतापजनक ट्विट केलं आहे. वीना मलिकच्या या पोस्टवर स्वरा भास्करने चांगलंच प्रत्युत्तर दिलं आहे. 

भारतीय सेनेकडून करण्यात आलेल्या एअर स्ट्राईकनंतर दुसऱ्याच दिवशी पाकिस्तानी विमानांनी जम्मू-काश्मीरच्या पुंछ आणि राजौरी सेक्टरमध्ये भारतीय सीमेचं उल्लंघन केलं. पाकिस्तानच्या या कुरापतीवर कारवाई करत असताना विंग कमांडर अभिनंदन यांचे भारतीय विमान मिग-२१ क्रॅश होऊन पाकिस्तानच्या हद्दीत कोसळले. त्यानंतर पाकिस्तानच्या ताब्यात असलेल्या अभिनंदन यांची सुटका करण्याची घोषणा करण्यात आली. शुक्रवारी दुपारी ३ ते ४ पर्यंत अभिनंदन भारतात परतणार आहेत. 

Read More