Marathi News> मनोरंजन
Advertisement

'स्वराज्यरक्षक संभाजी' मालिकेत शंभू राजांना होणार का अटक?

संभाजी महाराजांना होणार का अटक? 

'स्वराज्यरक्षक संभाजी' मालिकेत शंभू राजांना होणार का अटक?

मुंबई : स्वराज्यरक्षक संभाजी मालिकेत आता सर्वात मोठी घडामोड पाहायला मिळणार आहे. छत्रपती संभाजी महारांज्यांच्या निधनानंतर शंभू महाराजांवर मोठं संकट ओढावलं आहे. रायगडावरून अष्टप्रधान मंडळ पन्हाळ्यावर शंभू राजांना अटक करण्यासाठी पोहोचले आहेत. 

हे अष्टमंडळ संभाजी महाराजांच्या अटकेसाठी आल्याचे सांगतात. त्यावर संभाजी राजे गुन्हा काय असा सवाल विचारतात? अष्टमंडळ समोर उभे राहून त्यांच्यावर आरोपांच्या फैरी झाडतात. 

संभाजी महाराजांवर वेगवेगळे आरोप केले जातात. मात्र जेव्हा छत्रपती महाराजांच्या मृत्यूचा आरोप लावला जातो तेव्हा मात्र संभाजी महाराज ऐकून घेत नाहीत.... आता पुढे काय होणार हे पाहणं महत्वाचं असणार आहे 

छत्रपती शिवाजी महाराजांच्या निधनाचा प्रसंग ‘स्वराज्यरक्षक संभाजी’ या मालिकेतून दाखवण्यात आला आहे. यानंतर रायगडावर किती मोठे बदल होतात. संभाजी राजांना डावळून बाळ राजे गादीवर बसतात. राजमाता सोयराबाईंनी घेतलेला हा निर्णय कुणालाही न पटणारा असतो. पण आदेशामुळे सर्वचजण गप्प बसतात.

शिवाजी महाराजांच्या निर्वाणाबाबत त्याकाळी प्रचंड गुप्तता पाळली गेली होती, ज्येष्ठ पुत्र असूनही युवराज संभाजी राजांना अंत्यविधीच्या अधिकारापासून वंचित ठेवण्यात आलं होतं. या सगळ्या घटनेनंतर संभाजी राजांच्या आयुष्याला काय वळण मिळतं? रायगडावरच्या राजकारण कोणाच्या हातात जातं? अनाजी दत्तो, सोयराबाई आणि कारभारी मिळून कोणते नवे मनसुबे रचतात? औरंगजेबाच्या वाढत्या आक्रमणांना संभाजी राजे कसं थोपवतात?

झी मराठीवरील स्वराज्यरक्षक संभाजी या मालिकेने प्रेक्षकांची मने जिंकली आहेत. महाराजांचा इतिहास अगदी लहानांपासून अगदी मोठ्यांपर्यंत सारेचजण पसंत करत आहेत. ब्रॉडकास्ट ऑडियन्स रिसर्च काऊन्सिल इंडियाच्या रिपोर्टनुसार यंदाच्या आठवड्यात स्वराज्यरक्षक संभाजी मालिकेत चौथा क्रमांकावर आहे. 

Read More