Marathi News> मनोरंजन
Advertisement

सेक्स लाईफच्या प्रश्नांमुळे तापसी पन्नूचा करण जोहरच्या शोमध्ये येण्यासाठी नकार!

तापसी पन्नूनं नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत हा खुलासा केला आहे. 

सेक्स लाईफच्या प्रश्नांमुळे तापसी पन्नूचा करण जोहरच्या शोमध्ये येण्यासाठी नकार!

मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री तापसी पन्नू ही लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक आहे. तापसी सध्या 'दोबारा' या तिच्या आगामी चित्रपटाच्या तयारीत व्यस्त आहे. तापसीनं बॉलिवूडचा लोकप्रिय दिग्दर्शक आणि निर्माता करण जोहरच्या 'कॉफी विथ करण'मध्ये का हजेरी लावली नाही याविषयी खुलासा केला आहे. एका कार्यक्रमादरम्यान, तापसी पन्नू आणि अनुराग कश्यप त्यांच्या 'दोबारा' चित्रपटाचे प्रमोशन करत असताना, करण जोहर शेजारच्या रुममध्ये त्याच्या चॅट शोचे प्रमोशन करत होता. त्याची दखल घेत, मीडियानं तापसीला करणच्या शोमध्ये का बोलावले नाही याचे कारण विचारले.

'कॉफी विथ करण 7' मध्ये आमंत्रित न करण्यावर, तापसी म्हणाली की तिची सेक्स लाइफ इतकी मनोरंजक नाही. विशेष म्हणजे, करण जोहर 'कॉफी विथ करण 7' च्या आतापर्यंत प्रदर्शित झालेल्या एपिसोड्समध्ये शोच्या पाहुण्यांशी त्याच्या सेक्स लाइफवर बोलताना दिसतो. शोचे असे अनेक प्रोमो व्हायरल होण्याचे हेच मोठे कारण होते ज्यात सेलिब्रिटी सेक्सवर खुलेपणाने बोलताना दिसतात.

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

कॉफी विथ करण 7 मध्ये करण सेलिब्रिटींना त्यांच्या सेक्स लाइफवर प्रश्न विचारतो अशा अनेक कमेंट येणाऱ्या सेलिब्रिटींनी केल्या आहेत. आत्तापर्यंत, आलिया भट्ट, रणवीर सिंग, सारा अली खान, जान्हवी कपूर, अक्षय कुमार, समांथा रूथ प्रभू, लाइगर स्टार्स विजय देवरकोंडा, अनन्या पांडे आणि करीना कपूर खान यांच्यासह सेलिब्रिटी आमिर खान या शोमध्ये पाहुणे म्हणून हजेरी लावली होती. 

तापसी तिचा आगामी Dobaaraa या चित्रपटात  टाइम ट्रॅव्हलच्या रूपात एक अनोखी संकल्पना सादर करताना दिसणार आहे. लंडन फिल्म फेस्टिव्हल आणि फॅन्टासिया फिल्म फेस्टिव्हल 2022 सारख्या प्रतिष्ठित फिल्म फेस्टिव्हलमध्ये या चित्रपटाचे शो दाखवण्यात आले आहेत. दिग्दर्शक अनुराग कश्यप आणि तापसी यांना त्यांच्या 2018 मध्ये रिलीज झालेल्या मनमर्जियांनंतर पुन्हा एकत्र येताना दिसणार आहे,

तापसी पन्नूचे आगामी प्रोजेक्ट्स
'दोबारा' व्यतिरिक्त तापसी पन्नू राजकुमार हिरानीच्या पुढच्या 'डंकी'मध्ये शाहरुख खानसोबत दिसणार आहे. एक JIO स्टुडिओ, रेड चिलीज एंटरटेनमेंट आणि राजकुमार हिरानी फिल्म्स सादरीकरण, 'डंकी' अभिजात जोशी, कनिका ढिल्लन आणि हिरानी यांनी लिहिले आहे.

Read More