Marathi News> मनोरंजन
Advertisement

'Taarak Mehta...' फेम अभिनेत्रीने बोल्डनेसच्या सर्व सीमा केल्या पार

 अभिनेत्रीचा बोल्ड आणि हॉट अंदाज

'Taarak Mehta...' फेम अभिनेत्रीने बोल्डनेसच्या सर्व सीमा केल्या पार

मुंबई : 'तारक मेहता का उल्टा चश्मा' (Taarak Mehta Ka Ooltah Chashmah) मालिकेने सर्वांच्या मनात एक वेगळ स्थान निर्माण केलं आहे. मालिकेतील प्रत्येक पात्र चाहत्यांच्या फार जवळचं आहे. मालिकेत काही दिवसांपुर्वीचं आराधना शर्माची (Aradhana Sharma) एन्ट्री झाली. मलिकेच्या माध्यमातून तिला प्रचंड लोकप्रियता मिळाली.  आता आराधना तिच्या बोल्डनेसमुळे चर्चेत आली आहे. मालिकेत गुप्तहेराची भूमिका साकारणारी आराधना खऱ्या आयुष्यात मात्र फार बोल्ड आहे. 

सध्या सोशल मीडियावर तिचे काही फोटो व्हायरल होत आहेत. आराधनाने इन्स्टाग्रामवर काही काळ्या बिकनीमध्ये फोटो शेअर केले आहेत. ज्यामध्ये ती अत्यंत बोल्ड दिसत आहे. आराधना कायम सोशल मीडियावर ऍक्टिव्ह असते. सोशल मीडियावर तिच्या चाहत्यांची संख्या देखील फार मोठी आहे. 

दरम्यान आराधनाने नुकताचं एका मुलाखतीत करियरमध्ये आलेल्या वाईट प्रसंगांचा खुलासा केला. टीओआयला दिलेल्या एका मुलाखतीत कास्टिंग काऊचबद्दल सांगितलं. कास्टिंग काऊच एजेंटने तिच्यासोबत केलेल्या गैरवर्तवणुकीबद्दल सांगितलं. त्या प्रसंगानंतर ती स्वतःच्या वडिलांना देखील घाबरत होती. 

Read More