Marathi News> मनोरंजन
Advertisement

TMKOC : जेठालालचा विश्वासू बाघाची अशी आहे रिअल लाईफ, फोटो व्हायरल

 रिअल लाईफबाबत देखील जाणून घेण्यात त्यांच्या चाहत्यांना उत्सुकता आहे.

 TMKOC : जेठालालचा विश्वासू बाघाची अशी आहे रिअल लाईफ, फोटो व्हायरल

मुंबई : तारक मेहता का उल्टा चष्मा ही मालिका सलग 13 वर्ष ही मालिका प्रेक्षकांचं मनोरंजन करत आहे. आणि त्याचं खरं श्रेय या मालिकेच्या कलाकारांना आणि मेकर्सला जातं.  या मालिकेतील प्रत्येक पात्र आज लोकप्रिय झाले आहे. गोकुल धाम सोसायटीमधील प्रत्येक रहिवाशी आज प्रेक्षकांच्या मनावर राज्य करत आहे.

एवढंच नाही तर जेठालालसोबत असणारं बाघा हे पात्र देखील प्रेक्षकांच्या मनात विशेष स्थान निर्माण करण्यात यशस्वी झालं. या सगळ्या कलाकारांच्या रिअल लाईफबाबत देखील जाणून घेण्यात त्यांच्या चाहत्यांना उत्सुकता आहे.

या मालिकेत काम करणाऱ्या कलाकारांच्या रिअल लाईफमध्य़े काय घडते आहे याची माहिती चाहत्यांना सोशल मीडियावरुन मिळत असते. त्यात तारक मेहता का उल्टा चष्मा मधील आणखी एक व्यक्तिरेखा खूप प्रसिद्ध आहे ती म्हणजे बाघाची..

fallbacks

बाघा हा शोमध्ये बावरीशी लग्न केल्याचं दाखवण्यात आलं. अगदी शांत असणारा आणि मोजकंच बोलणारा बाघा खऱ्या आयुष्यात मात्र एक स्मार्ट व्यक्ती आहे. बाघाचं खरं नाव तन्मय वेकारिया आहे. 

खऱ्या आयुष्यात तो विवाहित आहे. आणि त्याला दोन मुलं देखील आहेत. दोन मुलांचा बाप असलेल्या बाघाचा एक फॅमिली फोटो चांगलाच व्हायरल होत आहे.

Read More