Marathi News> मनोरंजन
Advertisement

Taarak Mehta शो सोडण्याच्या चर्चेनंतर जेठालाल बेरोजगार अशी का होतेय चर्चा?

सलग 13 वर्ष ही मालिका प्रेक्षकांचं मनोरंजन करत आहे. 

  Taarak Mehta शो सोडण्याच्या चर्चेनंतर जेठालाल बेरोजगार अशी का होतेय चर्चा?

मुंबई : तारक मेहता का उल्टा चष्मा ही मालिका आज घराघरात पोहोचली आहे. आणि त्याचं खरं श्रेय या मालिकेच्या कलाकारांना आणि मेकर्सला जातं.

सलग 13 वर्ष ही मालिका प्रेक्षकांचं मनोरंजन करत आहे. या मालिकेतील प्रत्येक पात्र ही लोकप्रिय झाले आहे. गोकुल धाम सोसायटीमधील प्रत्येक रहिवाशी आज प्रेक्षकांच्या मनावर राज्य करत आहे.

 या मालिकेत जेठालालची भूमिका साकारणारा अभिनेता दिलीप जोशी  दमदार अभिनयामुळे आज सगळ्यांच्या मनावर राज्य करत आहे.  मीडिया रिपोर्ट्सनुसार, यापूर्वी अशी अफवा पसरली होती की, दिशा वाकाणीनंतर दिलीप जोशी ही शो सोडणार आहेत.

मात्र, शो सोडण्याच्या अफवांवर दिलीप जोशी म्हणाले की, जेठालाल या व्यक्तिरेखेमुळे मला प्रेक्षकांचे खूप प्रेम मिळाले आहे आणि ते गमावणे मला आवडणार नाही. 

fallbacks

पण या शोची ऑफर येण्याआधी जेठालालवर खऱ्या आयुष्यात काय प्रसंग आला होता, याबाबतच्या काही गोष्टी समोर आली आहे. अशी चर्चा आहे की, 'तारक मेहता का उल्टा चष्मा' ऑफर होण्यापूर्वी दिलीप हे वर्षभर बेरोजगार होते.

ते ज्या मालिकेत काम करत होते ती मालिका बंद झाली होती. मीडिया रिपोर्ट्सनुसार, दिलीप जोशी यांनी एकेकाळी इंडस्ट्री सोडण्याचा निर्णय घेतला होता. मात्र, कालांतराने त्यांना 'तारक मेहता का उल्टा चष्मा' ऑफर करण्यात आली आणि त्यानंतर जे काही घडले ते सगळ्यांनाच माहित आहे.

Read More