जगण्याच्या नव्या अंदाजानं सर्वांच्याच मनाचा ठाव घेणारी ही अभिनेत्री म्हणजे .....
मुंबई : टेलिव्हिजन विश्वात अतिशय गाजलेल्या अशा ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’, या मालिकेतील प्रत्येक कलाकार लोकप्रियतेच्या शिखरावर पोहोचला आहे. पण, या मालिकेतील एक लोकप्रिय चेहरा मात्र सध्या, या झोतापासून कुठंतरी दूर, आपल्याच मनाची हाक ऐकत त्याच दिशेनं जाऊ पाहत आहेत. सोशल मीडियावर सक्रिय असणाऱ्या आणि सध्याच्या घडीला दगदगीपासून दूर जाणाऱ्या या अभिनेत्रीचं एक वेगळं रुप सध्या पाहायला मिळत आहे.
आपल्या जगण्याच्या नव्या अंदाजानं सर्वांच्याच मनाचा ठाव घेणारी ही अभिनेत्री म्हणजे निधी भानूशाली, अर्थात या मालिकेतील ‘सोनू’. निधीनं हल्लीच तिचा एक युट्यूब चॅनल सुरु केला आहे. इथं ती तिचा एक सुरेख प्रवास सर्वांच्या भेटीला आणणार आहे. आपला एक खास मित्र आणि आणखी एका खास दोस्तासह ती एका रोडट्रीपवर निघाली आहे.
कोरोना काळात लॉकडाऊन असल्यामुळं घरातच डांबून राहिल्यानं निधीला काहीही सुधरत नव्हतं. अखेर तिनं एका सहलीचा बेत आखला आणि त्या वाटेवर निघाली. एका कारमधून ती हा प्रवास करणार असून, पुढचे काही दिवस ही कारच तिचं घर आणि सर्वकाही असणार आहे. कोणत्या आलिशान हॉटेलात नव्हे, तर जंगलात, नदी किनारी किंवा माळरानावर ती आणि तिचे सथीदार तंबू ठोकून राहणार आहेत.
निधीला मालिकेच्या माध्यमातून बरीच लोकप्रियता मिळाली होती पण, आता मात्र ती या कार्यक्रमाचा भाग नाही. व्यग्र वेळापत्रक आणि थकवणाऱ्या जगण्यापासून दूर ती सध्या एका वेगळ्याच विश्वात मग्न असल्याचं पाहायला मिळत आहे.
By clicking “Accept All Cookies”, you agree to the storing of cookies on your device to enhance site navigation, analyze site usage, and assist in our marketing efforts.