Marathi News> मनोरंजन
Advertisement

लेकिची पाठवणी करताना 'जेठालाल' यांना अश्रू अनावर; पाहा ते भावनिक क्षण

पाहा कसा दिसतो जेठालालचा जावई... 

लेकिची पाठवणी करताना 'जेठालाल' यांना अश्रू अनावर; पाहा ते भावनिक क्षण

मुंबई : आपल्या मुलीचं लग्न व्हावं, एका सुखी आणि समृद्ध कुटुंबात ती नांदावी अशीच प्रत्येक आई- वडिलांची इच्छा असते. ज्यावेळी लेकिला लग्नात सासरी पाठवायची वेळ येते तेव्हा प्रत्येक आई- वडिलांच्या मनाल कालवाकालव होते. भावनांचा काहूर माजतो. 

टेलिव्हिजन अभिनेते दिलीप जोशी म्हणजेच 'तारक मेहता का उल्टा चश्मा' (Taarak Mehta Ka Ooltah Chashmah) या मालिकेतील 'जेठालाल' यांच्याही मनात अशीच कालवाकालव झाली आणि त्यांना भावना दाटून आल्या.

मुलीच्या लग्नातील काही खास क्षणांचे फोटो जोशी यांनी सोशल मीडियावर शेअर केले. ज्यानंतर सोशल मीडियावर हे फोटो चांगलेच चर्चेत आले. 

मुलगी नियती आणि तिचा पती, आपला जावई यशोवर्धन या दोघांनाही जेशालाल यांनी नव्या आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्या. 

fallbacks

वधुरुपात आपल्या मुलीला पाहताना त्यांच्या चेहऱ्यावरील भाव अतिशय बोलके होते. 

fallbacks
fallbacks

प्रेक्षकांच्या मनाच्या अतिशय जवळ असणाऱ्या कलाकारांपैकी जेठालाल, म्हणजेच दिलीप जोशी हेसुद्धा एक असल्यामुळे चाहत्यांनी त्यांच्या मुलीवर मोठ्या मनानं शुभेच्छांचा वर्षाव केला. 

fallbacks

fallbacks

fallbacks

जोशी यांनी पोस्ट केलेल्या फोटोंच्या कमेंट सेक्शनमध्ये आलेली प्रत्येक प्रतिक्रिया ही त्यांच्यावर असणाऱ्या प्रेक्षकांच्या प्रेमाचीच साक्ष देऊन जात होती. 

Read More