Marathi News> मनोरंजन
Advertisement

तुम मेरी नही, तो किसीकी नही... बबितासाठी जेठालालनं कोणाला दिला इशारा

जेठालालच्या अशा बोलण्याचा अर्थ काय? 

तुम मेरी नही, तो किसीकी नही... बबितासाठी जेठालालनं कोणाला दिला इशारा

मुंबई : कॉमेडी शो 'तारक मेहता का उल्टा चष्मा' प्रेक्षकांच्या लोकप्रिय शोमधील एक आहे. गेल्या १३ वर्षांपासून मालिकेचा टीआरपी सगळ्यात जास्त आहे. या शोमधील सगळेच कलाकार लोकप्रियतेच्या शिखरावर आहेत. मात्र जेव्हा 'जेठालाल', 'दयाबेन' आणि 'बबीता' यांची उत्सुकता वाढते. 

तसेच प्रेक्षकांना जेठालाल आणि बबीता यांची खोटी भांडण देखील आवडतात. काही दिवसांपूर्वी मुनमुन दत्ता 'टप्पू'ची भूमिका साकारत असलेल्या राज अनादकतला डेट करत असल्याची चर्चा होती. 

मात्र याबातमीवर अद्याप कोणतीही प्रतिक्रिया आलेली नाही. मात्र या दरम्यान जेठालाल यांचा एक व्हिडीओ इंटरनेटवर व्हायरल झाला आहे. ज्यामध्ये त्यांनी बबीता बद्दल केलेलं वक्तव्य अधिकच चर्चेत आलं आहे.  

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Meme / Funny (@jetha.iyer)

'जेठालाल' यांचा व्हायरल व्हिडिओ त्यांच्या फॅन पेजवर शेअर करण्यात आला आहे. या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की, त्यांचा हा व्हिडिओ एका स्टेज शोदरम्यानचा आहे. या व्हिडिओमध्ये जेठालालसोबत दयाबेन, टप्पू, पोपटलालही स्टेजवर दिसत आहेत.

व्हिडिओमध्ये जेठालाल म्हणतात 'अरे भाऊ, लाज नाही वाटत तुम्हाला, लग्न झालेलं असून पण तुम्ही लोक बबिता-बबिता करत आहात'.  मी एका कोपऱ्यात येऊन तुम्हाला सांगतो की, 'जर ती माझ्या हातात नाही आली तर ती तुमच्या हातात कशी येणार?' यावर सगळेच हसू लागतात. 

जेठालालचे बोलणे ऐकून तेथे उपस्थित असलेले सर्वजण जोरजोरात हसू लागले. चाहत्यांना हा व्हिडिओ खूप आवडला आहे. चाहते व्हिडिओवर सतत कमेंट करून यावर आपली प्रतिक्रिया देत आहेत. यावर लोक मजेशीर इमोजी बनवून आपली प्रतिक्रियाही देत ​​आहेत.

Read More